अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत मंडळाकडून स्वामी भक्तांकरिता सतत विविध विधायक कार्याच्या माध्यमातून सेवा समर्पित कार्याने पुढे जात आहे., श्री क्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर पडणाऱ्या न्यासाच्या आवारात नवीन महाप्रसादालय उभारत असून, याचे तळमजला सल्याब एम-३५ श्रेणीचे कॉक्रीट टाकण्याचा शुभारंभ मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर न्यासाचे पदाधिकारी, विश्वस्त, क्रियाशील सदस्य, सेवेकरी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.*
दरम्यान न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, खजिनदार- लाला राठोड, क्रियाशील सदस्य- संदीप फुगे-पाटील, साई सुश्रृत डेव्हलपर्स एल.एल.पी. पुणे व्यवस्थापकीय संचालक- निहार अडकर, मनोज निकम, अरविंद शिंदे, सौरभ मोरे, रोहित खोबरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिवराज स्वामी, मैनुद्दीन कोरबू, साई सुश्रृत डेव्हलपर्स एल.एल.पी. पुणे चे मुख्य अभियंता- रामदास तांबे, मुख्य अधिकारी- प्रशांत काळे, प्रकल्प व्यवस्थापक- राजेंद्र पाटील, कनिष्ठ अभियंता- ऋषिकेश शिंदे, प्रकल्प व्यवस्थापक- रमाकांत कोष्टी, अमर बोंद्रे, बाबू चौगुले, सुभाष निकम, निखील पाटील, संजय गोंडाळ, प्रवीण घाटगे, वैभव मोरे, सनी सोनटक्के, सुमित घाडगे, बसवराज क्यार, महादेव अनगले, स्वामिनाथ मलवे, बिरप्पा व्हनझेंडे, गणेश भोसले, ज्ञानेश्वर भोसले, धानप्पा उमदी, मारुती बोरकर, समर्थ घाटगे, समर्थ चव्हाण, नामा भोसले, कुमार सलबत्ते, विशाल कलबुर्गी यांच्या सह क्रियाशील सदस्य, सेवेकरी, कर्मचारी उपस्थित होते.
या मंगलमय प्रसंगी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते मंत्र पठण, विधीवत पूजन संपन्न झाले.
सदर होणारी नवीन महाप्रसाद गृहाची इमारत भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असून, या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, एकूण ५ हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार असून, या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ६० कोटी, इतका अपेक्षित आहे. गेल्या नोव्हेंबर-२०२४ पासून सदरचे काम प्रगतीपथावर आहे, येत्या २ वर्षात हे महाप्रसादगृह भक्तांच्या सेवेत असणार आहे.

















