बीड : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व बीड अमेच्युअर खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली ६१ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा १८ ते २१ डिसेंबर दरम्यान बीडमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठीची गटवारी जाहीर झाली असून गतविजेते पुणे व धरशिवाने पुन्हा एकदा विजेतेपदासाठी जोरदार तयारी केल्याचे बोलले जात आहे.
या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन १८ डिसेंबर रोजीसायंकाळी ठीक ४.३० वा. श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात पार पडणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेक जॉन्सन यांच्या हस्ते पार पडणार असून त्यावेळी
मा. जतीन रहमान (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड), मा. नवनीत कावत (जिल्हा पोलीस अधिक्षक, बीड.), मा. शेखर पाटील (क्रीडा उपसंचालक, छ. संभाजीनगर विभाग), मा. डॉ. चंद्रजीत जाधव (सचिव महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, उपाध्यक्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन), मा. सुधाकर चिंचाणे साहेब (जिल्हा नियोजन अधिकारी, बीड), मा. अरविंद विद्यागर (जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड), मा. सचिन गोडबोले (उपाध्यक्ष महाराष्ट्र खो-खो असोसिएशन), मा. गोविंद शर्मा (कोषाध्यक्ष भारतीय खो-खो महासंघ), अॅमॅचुअर खो-खो असो. बीडचे अध्यक्ष – मा. ऋषिकेश शेळके, सचिव – मा. विजय जाहेर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गटवारी पुढील प्रमाणे आहे.
पुरुष गट : अ गट – पुणे, रायगड, छ. संभाजीनगर. ब गट – मुंबई उपनगर, नंदुरबार, सिंधुदुर्ग. क गट – सांगली, जळगाव, बीड. ड गट – धाराशिव, रत्नागिरी, लातूर. इ गट – मुंबई, परभणी, हिंगोली. फ गट – सोलापूर, नाशिक नांदेड. ग गट – अहिल्यानगर, धूळे, जालना. ह गट – ठाणे, सातारा, पालघर.
महिला गट : अ गट – धाराशिव, लातूर, परभणी. ब गट – सांगली, रायगड, जळगाव. क गट – पुणे, सातारा, सिंधुदुर्ग. ड गट – नाशिक, जालना, बीड. इ गट – रत्नागिरी, नंदुरबार, छ. संभाजीनगर. फ गट – सोलापूर, अहिल्यानगर, हिंगोली. ग गट – ठाणे, धुळे, नांदेड. ह गट – मुंबई, मुंबई उपनगर, पालघर.


























