बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी येथे आज शनिवार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती कार्यक्रम व फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीटीईटी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यासाठी अध्यक्ष म्हणून अमृत सरडे, बालविकास प्रकल्प अधिकारी सोलापूर (वर्ग १), प्रमुख पाहुणे म्हणून विशाल भोसले, बालविकास प्रकल्प अधिकारी दक्षिण सोलापूर (वर्ग २), समाधान नागणे, बालविकास प्रकल्प अधिकारी बार्शी (वर्ग २) हे तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ दीपक गुंड सर हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविक प्रा. गायकवाड जे. पी. यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. दीपक गुंड सर यांनी करुन दिला. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते CTET मध्ये पात्र झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कु. दळवी प्रियंका, कु. देवराम प्रियंका, कु. इंगोले श्वेता तसेच माजी विद्यार्थिनी कु. राजनंदिनी गाडेकर यांनी देखील आपल्या सत्काराला उत्तर देताना अध्यापक विद्यालयाच्या उपक्रमांचे तसेच अध्ययन अध्यापनाचे, शिस्त लावण्याचे कौतुक केले व आभार मानले.
यानंतर प्रमुख पाहुणे समाधान नागणे यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी संघर्ष, अडचणी या नकळत आपणास मोठे करत असतात. त्यांनी स्वतःचा संघर्ष व त्यातून कसा मार्ग काढला याविषयी माहिती सांगितली. कठीण परिस्थितीत हार मानायची नाही. स्वतःला वेळ द्या. यानंतर विशाल भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय जीवनातील आपले अनुभव सांगितले व अडचणीतून कसा मार्ग काढायचा व यश मिळवायचे हे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे अभ्यास करुन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. स्पर्धेचे हे युग आहे त्यात आपण टिकणे व यश मिळविणे सोपे नाही. प्रत्येकाने स्वतःशी स्पर्धा करावी असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अमृत सरडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण केली. त्यांनी स्वतःचा शैक्षणिक प्रवासात आलेल्या अडचणी आणि त्यातून झालेली जडणघडण याविषयी माहिती सांगितली. अध्यापक विद्यालयातील आपल्या शैक्षणिक प्रवासात मिळालेल्या शिदोरीचा आयुष्यात कसा फायदा झाला याविषयी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार कु. आरती मोटे यांनी मांडले.
कु. प्रगती भाले व कु. आरती चव्हाण यांनी केले.

























