माढा : कुर्डूवाडी ते सोलापूर रेल्वे मार्गातील माढा तालुक्यातील महातपूर गेट शुक्रवार ३१ ऑक्टोबर सकाळी ७ वाजल्यापासून कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असून माढा महातपूर गेट वर कोणताही रेल्वे कर्मचारी या कालावधीपासून नसणार आहे. माढा महातपूर मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणच्या पुलाखालून हलक्या वाहनांसाठी वाहतूक करण्यासाठी पर्यायी व्यवस्था रेल्वे पूल नं 390/2 (रेल्वे किमी 390/6-8) येथून करण्यात आली आहे.
माढा महापूर गेट नंबर ४१ या ठिकाणाचे भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने हे गेट कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे.या भुयारी मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गाचे वाहतूक बंद असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तसेच त्या ठिकाणच्या जड वाहनासाठी पर्यायी मार्ग म्हणजे माढा वैराग रोडवरील गेट नंबर ४२ वरून करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने या संदर्भातील माहिती माढा नगरपंचायत, महापूर ग्रामपंचायत,माढा बस स्थानक, तहसील कार्यालय व माढा पोलीस स्टेशन यांना पत्राद्वारे कळवण्यात आली आहे.
गेट नंबर ४१माढा महातपूर या ठिकाणचे भुयारीकरण चालू असल्याने कायम गेट बंद करण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाच्या वतीने हलक्या वाहनांसाठी केलेल्या पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांनी करावा असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या मार्गाचा अवलंब करून नागरिकांनी सहकार्य करावे असेही सांगण्यात आले आहे.


















