सोलापूर – दंगा व मारामारी करणे, मुलीला जबरदस्तीने पळवून नेणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या मैनोदीन म. रफीक हत्तुरे (वय 32, रा. हतुरे कॉम्प्लेक्स, बेगम पेठ) यास सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिला आहे.
हत्तुरे यांच्याविरुद्ध 2016, 2021, 2022 व 2025 मध्ये जमाव जमवून दंगा व मारामारी करणे, मुलीला जबरदस्तीने पळवून नेणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्याकडून तडीपारचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त कबाडे यांना सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त कबाडे यांनी हत्तुरे यास सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे.