माळशिरस : हिंदू संस्कृती मधील महिलांचा मकर संक्रांतीचा हा मोठा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ओवसायला जाण्याचा मुहर्त दुपारी तीन नंतर असल्याने येथील सर्वच मंदिरात दुपारी तीन नंतर महिलांनी प्रचंड गर्दी केली होती दुपारनंतर सर्व रस्ते महिलांनी फुलुन गेले होते. महिला अनेक अलंकार घालून नवीन साड्या परिधान करून ववसा घेऊन मंदिरात आल्या होत्या.
देवदर्शनानंतर एकमेकीना हळदी कुंकू लावून ववसा देत होत्या व तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत होत्या .तसेच पुरुष वर्ग लहानांना तिळगुळ देऊन आशीर्वाद देत होते. आज पासून रथसप्तमी पर्यंत महिलांना घरी बोलवून हळदी कुकु लावुन आपआपल्या इच्छेनुसार भेट वस्तु देत असतात ही हिंदू संस्कृतीची परंपरा आजही टिकून आहे


















