अक्कलकोट – तालुक्यातील गुरववाडीचे सरपंच विकासरत्न माळप्पा पुजारी यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सोलापूर येथील विश्व परिवर्तन फाउंडेशन व लेटेस्ट न्यूज यांच्यावतीने सरपंच माळप्पा पुजारी यांचा सन्मान करण्यात आला. सरपंच माळप्पा पुजारी यांनी गुरववाडीच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांचा पाठपुरावा करून कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे.
गुरववाडीतील पाणी प्रश्न सोडवणे , गावातील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करणे, जिल्हा परिषद शाळेला सुविधा पुरविणे आदींसह विविध विकास कामांद्वारे सरपंच माळप्पा पुजारी यांनी गुरववाडीचा विकास केला आहे. त्यांच्या कामाची दखल घेत सोलापूर येथे विश्व परिवर्तन फाउंडेशन तर्फे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मुख्य राज्य संघटक मुजम्मिल शेख , राष्ट्रीय संचालक उपसंपादक इकबाल शेख, राष्ट्रीय महिला अध्यक्ष नसीमा शेतसंदी, संस्थापक अध्यक्ष तथा संपादक अश्फाक शेख , जनता संघर्ष न्यूज चे संपादक सिद्धार्थ भडकुंबे आदींसह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच माळप्पा पुजारी यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवसेना नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे , दुधनीचे शिवसेना नेते शंकर म्हेत्रे दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे आदीसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

























