तभा वृत्तसेवा मुदखेड :
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना मुदखेड तालुक्याच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय माळकौठा येथे काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते .
प्रहार दिव्यांग संघटनेच्या निवेदनाची त्वरित दखल घेऊन ग्रामसेवक संजय देशमुख, उपसरपंच, सचिव यांनी मौजे माळकौठा ग्रामपंचायतीने 34 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी 2.000 हजार रुपये वितरीत केले .
तसेच ग्रामसेवक साहेबांनी प्रहार तालुका उपाध्यक्ष दिलिप शिंदे पाटील मुदखेड, यांच्या उपस्थितीत दिव्यांग बांधवांसाठी 5% निधी विपरीत करण्यात आल्या बद्दल ग्रामपंचायत कार्यालयांचे अभिनंदन केले.
यावेळी संजय पाटील शिंदे, प्रहार शाखा प्रमुख श्रीप्रभू शिंदे, शाखा उपाध्यक्ष, शाखा सचिव एसवंत जाधव.. असंख्य प्रहार कार्यकर्ते..यांच्या उपस्थितीत आज रोजी बुधवारी दुपारी 02:30 वाजता 15 वित्त आयोगातून 5% निधी विपरीत करण्यात आला …
असेच मुदखेड तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला 5% निधी दिव्यांग बांधवांना मिळून जावे यासाठी प्रहार तालुका अध्यक्ष अनिल शेटे पाटील,व प्रहार महिला अध्यक्षा सौ केशरताई शिंदे पाटील प्रतिक्षेत आहेत…