मुक्रमाबाद – प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील तलाठी महेश पदाजी यांची देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथे बदली झाल्याने दि. ९ सप्टेंबर रोजी ग्रा.प.कार्यालयाच्या वतीने पदाजी याना निरोप देण्यात आला व त्यांच्या जागी नुतन रुजु झालेले केतेश्वर माधवराव कोंडलवाडे यांचाही यावेळी सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुभाषअप्पा बोधणे व प्रमुख पाहुणे म्हणून तमाप्पा गंदिगुडे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश सावकार पंदिलवार,
सरपंच प्रतिनिधी बालाजी बोधणे, ग्रा.प.सदस्य शंकरअण्णा खंकरे, गौसखाँ पठाण,उपसरपंच सदाशिव बोयवार, तलाठी शिवाजी तोतरे , शिवम पाटील ,अमजद पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. पदाजी यांच्या कार्यकाळात लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या स्वेच्छा पुनर्वसनाचा मावेजा वितरीत करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली
असल्याचे बालाजी बोधणे यांनी अधोरेखित केली. नव्याने रुजू झालेले तलाठी केतेश्वर कोंडलवाडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला .यावेळी शेशिकांत तेलंग,महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे अध्यक्ष अशोक लोणीकर ,प्रा.बलभीम देवकत्ते , पञकार लक्ष्मण कोळेकर आदी उपस्थित होते. सुञसंचलन व आभार सदाशिव बोयवार यांनी मानले.