नांदेड – नांदेड दक्षिण मतदार संघातील धनेगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी मतदाराशी कॉर्नर बैठकीतून संवाद साधुन भेटीगाठीना वेग आला आहे.
धनेगाव पंकज नगर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एक मतदाराशी बैठक घेऊन संवाद साधण्यात आला या बैठकीस परिसरातील सुजाण नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मनोहर पाटील शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी या परिसरात जनतेने मागण्याचा अगोदर त्यांच्या अडीअडचणी दूर केल्या आहेत आणि सर्वांना साक्षीने सांगतो की यापुढेही तुमची कुठलीही विकासात्मक तक्रार येऊ देणार नाही लागला तेवढा निधी देण्याची आश्वासन दिले.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष एम.डी.शिंदे,सचिव विठ्ठल दावेवार , भास्कर पालीमवार, रामकृष्ण डोईजड,विजय येरावार, एकनाथ मोरे , महेंद्र देशमुख, धनेगाव माजी सरपंच भुजंगराव भालके, सरपंच पिंटू पाटील शिंदे, रमेश वाघमारे, राजेश बोटलवार, शिवाजी बुचडे, शेख एजाज, तातेराव ढवळे, निलेश भालके, जळबाजी बुचडे, गोपीचंद धनेगावकर, मारुती संगेकर, शैलेश ठाकूर, मारुती तळणे आदींचा सहभाग होता.




















