सोलापूर – नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक शाळा व माध्यमिक प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथम मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, ज्येष्ठ मराठी शिक्षक राजकुमार मरगुरे, प्रशांत स्वामी ,मीनाक्षी वांगीकर आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘मराठी मायबोली, मराठी माझी शान आणि या बालांनो या रे या’ हे समूहगीते सादर केले.अर्णव इंगळे, संस्कार हिरेमठ, हर्षद क्यातन, साईदीप मासपत्री, गौतम रच्चा, दिया चपळगे, श्राव्या नडगिरी, तन्वी जोजन, श्रावणी नागठाण, श्रीनिधी कुसमगी, अक्षरा वड्डेपल्ली आदी विद्यार्थ्यांनी यांनी मराठी भाषा गौरव गीत सादर केले.
मुजरिम मुल्ला व वैष्णवी वाले या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगितले.सहशिक्षक प्रशांत स्वामी यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितले.पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे व जेष्ठ शिक्षक राजकुमार मरगुरे यांनी मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले.यावेळी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार म्हणाले,मराठी ही आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची जीवन वाहिनी आहे.
विद्यार्थ्यानी मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी नियमित वर्तमानपत्रे, कविता, कथासंग्रह व पाठ्यपुस्तकांचे वाचन करावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती पाटील यांनी केले तर शिवानंद पुजारी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.

























