सोलापूर : नूतन महापौर विनायक कोंड्याल यांनी सोमवारी माजी मंत्री व सोलापूर दक्षिणचे आ. सुभाषबापू देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी या दोहोंनी शहराचे प्रश्न, विकास कामासंदर्भात सकारात्मक संवाद साधला.
यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी नूतन महापौर विनायक कोंड्याल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. महापौरपदाच्या जबाबदारीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान सोलापूर शहराच्या विकासकामांबाबत, नागरी समस्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच आगामी विकासात्मक योजनांवर सकारात्मक चर्चा झाली.
महापौर विनायक कोंड्याल यांनी शहराच्या हितासाठी सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करण्याची भूमिका व्यक्त केली.याप्रसंगी मनीष देशमुख यांनी अन्नपूर्णा योजनेसंदर्भात महापौरांना माहिती दिली. यावेळी शहरातील नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.























