तभा वृत्तसेवा,
भोकरदन : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये 55 गावांमध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध मतदार संघात 29 ऑगस्ट. 2024 ते 2 सप्टेंबर . 2024 दरम्यान घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या आदेशानुसार OBC प्रमुख वक्ते श्री शिवकुमार देवकाते हे बैठकीची नेतृत्वात . घोंगडी बैठकीच्या माध्यमातून पक्षाचे ध्येय धोरण आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचे गेल्या पन्नास वर्षातल्या राजकारणात महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान आणि ओबीसीसाठी केलेल्या कामासंदर्भात माहिती या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
तसेच माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब यांना उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला घोंगडी बैठकीचा पहिला टप्पा 29 ऑगस्ट 2024 ते 02 सप्टेंबर 2024 दरम्यान पूर्ण झालाआहे या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश शेठ सपकाळ, तालुकाध्यक्ष रामधन पाटील कळंबे ,युवकचे प्राध्यापक अंकुश जाधव सर, श्री नितीन शिवणकर, ओबीसी सेलचे वर्धमान वास्कर ,श्री विठ्ठल गोरे, यांचा प्रामुख्याने सहभाग होता तसेच पत्रकार परिषदेला उपस्थित पदाधिकारी खालील प्रमाणे माजी उपनगराध्यक्ष शफिक शेठ पठाण, लक्ष्मण ठोंबरे ,नसीम पठाण, कबीर बापू ,रमेश बर्डे, राधाकिसन भोसले नजीम शहा, सय्यद आरिफ, बंटी काका ,गजानन जाधव, राजू बोराडे , घोडे टेलर, अंगद सहाने, शंकर भुजाडे तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते विधानसभा मतदार संघात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे