मायक्रोसॉफ्टने या समस्येची अडचण देशभरात आली. भारतातील इंडिगो, स्पाइसजेटसह अनेक विमान कंपन्यांची विमाने उड्डाणे रद्द करावी लागली. इंडिगोने यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली. भारत सरकारने यासंदर्भात मायक्रोसॉफ्ट कंपनीशी संपर्क साधण्यात आला आहे.
जगभरातील संगणकावर असलेल्या सर्व सेवा शुक्रवारी बंद पडल्या. बँकांचे काम थांबले. शेअर मार्केट बंद झाले. विमानांचे उड्डान रद्द झाले. कारण जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर प्रोव्हाईड करणारी कंपनी मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बिघडले. जगभरातील संगणक अन् लॅपटॉपवर असणाऱ्या Windows सिस्टमवर ब्लू स्क्रीन आली. भारतासह सर्वच देशांवर याचा परिणाम झाला. भारत सरकारने मायक्रोसॉफ्ट कंपनीशी संपर्क साधला आहे. मुंबई विमानतळावरील उड्डाणे रद्द झाली आहेत.
मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात निर्माण झालेली ही समस्या Azure बॅकएंड वर्कलोड्सच्या कॉन्फिगरेशनमध्ये बदल केल्यामुळे झाली. ज्यामुळे स्टोरेज आणि कॅप्यूटर रिसोर्सेसमध्ये अडथळे निर्माण झाले. त्याचा परिणाम कनेक्टिव्हिटी फेलियरमध्ये झाला. आता ही अडचण तुम्हाली आली असणार तर ती दूर कशी करावी याची माहितीही मायक्रोसॉफ्टने दिली.
या स्टेप वापरुन दूर करा समस्या
मायक्रोसॉफ्टने या तांत्रिक समस्येतून बाहेर येण्यासाठी काही स्टेप दिल्या आहेत. त्याचा वापर करुन ही समस्या दूर करता येणार आहे.
Windows सुरक्षित मोड किंवा Windows Recovery Environment मध्ये बूट करावे लागेल.
यानंतर त्यांना C:\Windows\System32\drivers\CrowdStrike डिरेक्टरीवर जावे लागेल.
यानंतर त्यांना C-00000291*.sys फाईल शोधावी लागेल आणि ती हटवावी लागेल.
शेवटी तुमचे संगणक रीस्टार्ट करावे लागेल.
भारताकडून मायक्रोसॉफ्टशी संपर्क
मायक्रोसॉफ्टने या समस्येची अडचण देशभरात आली. भारतातील इंडिगो, स्पाइसजेटसह अनेक विमान कंपन्यांची विमाने उड्डाणे रद्द करावी लागली. इंडिगोने यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली. भारत सरकारने यासंदर्भात मायक्रोसॉफ्ट कंपनीशी संपर्क साधण्यात आला आहे. या घटनेचा सर्वात जास्त प्रभाव अमेरिकेवर झाला आहे. अमेरिकेतील अत्यावश्यक सेवा 911 बंद पडली आहे.
अनेक देशांमध्ये सेवा ठप्प
अमेरिकेशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि जर्मनीमध्ये बँकिंग, टेलिकॉम, मीडिया आउटलेट आणि एअरलाइन्सच्या सेवांवरही परिणाम झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटरने सांगितले की, शुक्रवारी दुपारी देशातील अनेक कंपन्यांच्या सेवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. स्काय न्यूज या प्रमुख ब्रिटीश वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण बंद झाले आहे. स्काय न्यूज वाहिनीचे प्रसारण होत नसल्याचे चॅनलचे कार्यकारी अध्यक्ष डेव्हिड रोड्स यांनी सांगितले.