अक्कलकोट – नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी हे १४,८६१ अशी विक्रमी मते घेऊन विजयी झाले. शिवसेना शिंदे पक्षाचे रईस टिनवाला ६३०८ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहून एक नगरसेवक निवडून आणले आहे.काँग्रेसचे अशपाक बळोरगी यांना २,६,४७ मते पडले असून तिसऱ्या स्थानावर राहून दोन नगरसेवक निवडून आले आहे. शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे दारुण पराभव भाजपाने केला आहे.
अक्कलकोट नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. दरवेळी भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी कडवी लढत होत असते. मात्र यावेळी काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करून आव्हान निर्माण केले होते.अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीत ३८,४४२ पैकी २४,७०० मतदान झाले होते.या पैकी भाजपाचे मिलन कल्याण शेट्टी यांना १४,८,६१ मते मिळाली तर शिवसेनेचे रईस टिनवाला यांना ६,३०८ मते प्राप्त झाली. काँग्रेसचे उमेदवार अशपाक बळोरगी यांना २,६४७ मते पडली तर अपक्ष नागनाथ उमदी यांना ३९४ मते मिळाली. शिवसेना उबाठा गटाचे बाबासाहेब जाधव यांना १८५ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इकरार शेख यांना ८२ मते मिळाली.
भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर शिवसेनेने सर्व ताकद पणाला लावली होती. काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न होता.
या निवडणुकीसाठी भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती तर शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला आवाहन केले होते. काँग्रेसकडून खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना साद घातली होती.विधानसभा निवडणुकीनंतरच भाजपाने नगरपालिका निवडणुकीसाठी फिल्डिंग लावली होती. एक वर्ष भरापूर्वीच नगराध्यक्ष म्हणून मिलन कल्याणशेट्टी यांचा प्रचार सुरू झाला होता.
शिवसेनेच्या स्थापनेपासून कधीही धनुष्यबाण चिन्ह निवडणुकीच्या मैदानात नव्हते. मात्र माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्री यांनी शिवसेना प्रवेश करून धनुष्यबाण चिन्हावर ही निवडणूक लढविली होती. पहिल्याच प्रयत्नात त्यांना ६,३०८ मते मिळाली. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला काँग्रेसचे उमेदवार अशपाक बळोरगी यांनी दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या लढतीत आपला विजय निश्चित असल्याचा दावा केला होता.
अक्कलकोट नगरपालिकेत बारा प्रभाग मध्ये २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी भाजपाने २३ ठिकाणी दणदणीत विजय मिळवला असून दोन ठिकाणी काँग्रेसला यश मिळाले तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले. भाजपकडून विजयी उमेदवारांमध्ये माजी नगराध्यक्ष तथा वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे आरपीआयचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे हे भाजपाकडून विजयी झाले.
प्रभाग क्रमांक एक अ मध्ये भाजपाच्या सुनंदा स्वामी १०१५ मते घेऊन विजय.प्रभाग एक ब मध्ये भाजपचे भीमराव शेळके १०२९ मते घेऊन विजय. प्रभाग दोन- अ मध्ये भाजपाचे कस्तुरा चौगुले ९८१ मते घेऊन विजय.प्रभाग दोन ब मध्ये भाजपाचे लक्ष्मीकांत धनशेट्टी ९४५ मते घेऊन विजय. प्रभाग तीन अ मध्ये काँग्रेसचे मुस्तफा बळोरगी ११२६ मते घेऊन विजय. प्रभाग तीन ब मध्ये काँग्रेस जहिराबी शेख १०९९ मते घेऊन विजय.प्रभाग चार अ मध्ये भाजपाचे अविनाश मडिखांबे १३०१ मते घेऊन विजय. प्रभाग चार ब मध्ये भाजपचे मंजना कामणूरकर ११४१ मते घेऊन विजय.प्रभाग पाच अ मध्ये भाजपाचे रेणुका राठोड १३७५ मते घेऊन विजय.प्रभाग पाच ब मध्ये भाजपा रमेश कापसे १३०९ मते घेऊन विजय. प्रभाग सहा अ मध्ये भाजपाचे अपर्णा सिद्धे ९७५ मते घेऊन विजय.प्रभाग सहा ब मध्ये भाजपाचे यशवंत धोंगडे १०४७ मते घेऊन विजय.प्रभाग सात अ मध्ये भाजपा नविद डांगे १३६० मते घेऊन विजय. प्रभाग सात ब मध्ये भाजपा अमृता शिंदे ९१३ मते घेऊन विजय. प्रभाग आठ अ मध्ये भाजपा शैला स्वामी ११५४ मते घेऊन विजय. प्रभाग आठ ब मध्ये भाजपाचे महेश हिंडोळे ११९७ मते घेऊन विजय. प्रभाग नऊ अ मध्ये भाजपाचे स्नेहा खवळे १०९८ मते घेऊन विजय.प्रभाग नऊ ब मध्ये भाजपा सद्दाम शेरीकर ११०७ मते घेऊन विजय. प्रभाग १० अ मध्ये भाजपाचे सोनाली शिंदे १०१९ मते घेऊन विजय.प्रभाग १० ब मध्ये भाजपाचे देविदास कवटगी ९०४ मते घेऊन विजय.प्रभाग अकरा अ मध्ये शिवसेनाचे सरिता कुर्ले १२६९ मते घेऊन विजय.प्रभाग अकरा ब मध्ये भाजपाचे महेश इंगळे १३२१ मते घेऊन विजय. प्रभाग १२ अ मध्ये भाजपाचे ऋतुराज राठोड १५९४ मते घेऊन विजय. प्रभाग १२ ब मध्ये भाजपाचे भागुबाई कुंभार १३६३ मते घेऊन विजय. प्रभाग १२ क मध्ये भाजपाचे अल्फिया कोरबू १४४८ मते घेऊन विजय.याप्रमाणे २५ उमेदवारांपैकी २२उमेदवार भाजपाचे विजयी झाले असून दोन काँग्रेसचे तर एक जागा शिवसेनेला मिळाली आहे.
अक्कलकोट शहरात मतमोजणीचा अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्ष (भाजप) कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील प्रमुख ठिकाणी फटाके फोडून, घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. विशेषतः शहरात झालेल्या या जल्लोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.या जल्लोषासोबतच नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी आणि नगरसेवक अविनाश मडिखांबे यांच्या विजयी घोषणांचे मोठे बॅनर झळकताना दिसले. राजू भगळे मित्र परिवाराच्या वतीने लावण्यात आलेल्या या बॅनरबाजीमुळे संपूर्ण परिसराचे लक्ष वेधले गेले. कार्यकर्त्यांमध्ये विजयाबाबत प्रचंड आत्मविश्वास दिसून येत होता.
निकाल जाहीर होण्यापूर्वीच झालेल्या या जल्लोषावर नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी उत्साहाचे स्वागत केले, तर काहींनी निवडणूक आचारसंहिता आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या जल्लोषावर प्रश्न उपस्थित केले. वर्दळीच्या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.


























