शेतकऱ्यांच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर दुग्धभिषेक आंदोलन
जाफराबाद –
मागच्या काही वर्षापासून शेतीपूरक व्यवसाय जोडधंदा त्याला म्हटले जाते तो आहे .दुग्ध व्यवसाय या दोन वर्षांमध्ये प्रत्येक खेड्यातला ५० ते ६० तरुण आज गुंतलेला आहे ज्याने बँकेचे कर्ज घेत, आपल्या घरातील महिलांचे दागिने गहाण ठेवून शेतीला जोडधंदा म्हणून तरुणांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. पण सध्याच्या परिस्थितीत दुग्ध व्यवसाय करायला खुप अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकारने दुधाला हमीभाव ४० रु द्यावा अशी मागणी लोकजागर संघटनेचे अध्यक्ष श्री केशव पाटील जंजाळ यांनी केली आहे.
शेतकर्यांना दुग्ध व्यवसाय परवडत नाही किंबहुना पुढच्या काळामध्ये ह्या तरुणांना काही विकावे लागतील किंवा जमिनी विकाव्या लागतील. सरकारने जे ५ रुपये अनुदान सुद्धा आद्यापर्यंत जाफरातालुक्यामध्ये शेतकऱ्यांना मिळालेला नाहीयेत. तरी अधिवेशनामध्ये शेतकरयांना ४० रु हमीभाव देण्याच निर्णय घेण्यात यावा अशी मागणी निवेदनात म्हटले आहे हे निवेदन तहसीलदार जाफराबाद यांना सादर केले आहे.
यावेळी प्रकाश शेळके, हर्षल बापू फदाट, प्रकाश शेळके, योगेश भोपळे, गोपाल बराटे, संदेश फदाट यांची उपस्थिती होती.
आज तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे दूग्धभिषेक आंदोलन…
दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी दुधाचे दर कमी झाल्याने संकटात सापडले असून,
दुधाला ४०₹ हमीभाव मिळावा, यासाठी आज तहसील कार्यालयासमोर दूधभिषेक आंदोलन करण्यात येणार आहे.