तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
3 जुलै घनसावंगी, महसूल, पोलिस
अधिकारी यांच्या कृपेने घनसावंगी विधानसभा मतदारसंघात रात्रंदिवस सर्रास वाळूची चोरी सुरू आहे. ती थांबविण्याकरिता नागरिकांनी आमदार बबनराव लोणीकर यांना निवेदन दिले. दरम्यान, जालना जिल्ह्यात होत असलेल्या वाळू चोरीच्या प्रश्नाकडे लक्षवेधीद्वारे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे आश्वासन यावेळी लोणीकरांनी नागरिकांना दिले. घनसावंगी विधानसभा
मतदारसंघात दहा हजार घरकुल मंजूर झाले असून, घरकुलांच्या बांधकामांसह विकासकामांना वाळू मिळत नसून तालुक्यातील रामसगाव, जोगलादेवी, शेवता, सौंदलगाव, बानेगाव, भोगाव, मुद्रगाव, मंगरूळ या गावांतील गोदापात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.
हायवाद्वारे दिवसाढवळ्या वाहतूक केली जाते. याबाबत भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य अंकुशराव बोबडे यांच्या नेतृत्वात नागरिकांच्या
शिष्टमंडळाने आमदार लोणीकर यांना निवेदन दिले. वाळू वाहतूक थांबविण्यासह गोदापात्रातील वाळू चोरांनी केलेल्या खड्ड्यांची मोजणी करून तहसीलदार घनसावंगी, तहसीलदार अंबड, पोलिस निरीक्षक तीर्थपुरी आणि गोंदी यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी अंकुश बोबडे, कैलास शेळके, बाबा आटुळे, सदाशिव यादव, अमोल काळे, संदीप काळे आदी उपस्थित होते