इस्लापूर / नांदेड – नुकतेच मदत फाउंडेशन सामाजिक संस्था नागपूरच्या वतीने किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील रहिवासी असलेले दैनिक गावकरीचे तालुका प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांना नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम, प्राध्यापक किशनरावजी मिराशे यांनी सोनपेठ येथील बिरसा मुंडा जयंतीच्या व्यासपीठावर शाल श्रीफळ व हार देऊन त्यांनी सन्मान केला.
पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर इस्लापूर ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी नारायण शिनगारे माजी सरपंच सूर्यकांत बोधनकर ,ज्येष्ठ पत्रकार नारायण दंतलवाड,जगदीश हनवते ,गौरव कदम, पत्रकार प्रमोद जाधव ,विकास माहुरकर, यांनी इस्लापूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. तर शासकीय आश्रम शाळा सहस्त्रकुंड येथील मुख्याध्यापक बुरकुले सर व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने शासकीय आश्रम शाळा सहस्त्रकुंड येथे सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारा संदर्भात आदिवासी नेते, दादाराव टारपे, नांदेड जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष सौ जनाबाई डुडुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुर्यकांत आरडकर, पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड, भगवानराव हुरदुके,जयवंतराव वानोळे, परसराम फोले, माधवराव वानोळे, बालाजी आलेवार, माजी भाजपा तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष बाबुराव केंद्रे, शिवसेनेचे गजानन बच्चेवार, तालुका आरोग्य अधिकारी किशनराव गायकवाड ,डॉक्टर गीत कुमार पवार,डॉक्टर आनंद सूर्यवंशी, डॉक्टर शिवाजी शिंदे, डॉक्टर भगवान गंगासागर, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते रवी कसबे, आनंद साखरे, राजेश गायकवाड, शिवाजी बोटेवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र घोगरे, सचिव दिलीप रायफलवार, हुडी येथील शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते नंदकुमार देशमुख, पांडुरंग पाटील भिसीकर, खंडू गिरासे, जगदीश माने, यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवरांनी पुढील कार्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.
समाज बांधवांच्या वतीने किनवट नगरीमध्ये भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.



















