करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील आज निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. आ. सतेज पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
पाटील हे रविवारी बाथरूममध्ये पडले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज सडोली खालसा या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी अंत्यदर्शनासाठी पाटील यांचे पार्थिव कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ठेवणार येणार आहे.
पाटील हे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.