तभा फ्लॅश न्यूज/मुक्रमाबाद : मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद शहर हा निजामकालीन शहर म्हणून ओळखल जातो. या शहराला कर्नाटक,तेलंगणा,तिन राज्याचे नागरीक ये-जा करतात,पण गेल्या चाळीस वर्षांपूर्वी बसस्थानक इमारत बांधली होती,सदरील इमारत मोडक्अळीस झाली आहे. पण गेल्या चाळीस वर्षापासून लोकप्रतिनिधी,स्थानिक नेते या विषयावर काहीच फरक पडले नाही. उलट याकडे स्थानिक नेते गप्प बसल्याशिवाय दुसरे काहीच केली नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधीना व स्थानिक,बाहेरील नेत्यांना हा बसस्थानक दिसला नाही का असा सवाल नागरीक उपस्थित करतात. तुमच्या गावचा नेता कोन आहे. असा सवाल नागरीक उपस्थित करतात,पण नाव मोठे लक्षण खोटे आहे. बसस्थानकावर दिवसभर अवैध प्रवाशांची वाहातूक करणारी अनेक वाहाने बसस्थानक धुमाकूळ घातला आहे. या बसस्थानकावर दिवसाकाठी महामंडळाचे बससेवा करणार्या बसेसला थांबा थांबा करण्याची गैरसोय झाली आहे. सा बा विभागाचेही आधिकारी फक्त डोळ्याने पाहील्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नाहीत.
शेकडो विद्यार्थी व नागरीक या स्थानकात थांबतात. परंतु येथे थांबण्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था नाही. पिण्यासाठी पाणी नाही धगधगत्या उन्हात नागरिकांना सावली देखील नाही. यामुळे आजू -बाजूंच्या दुकानाचा सहारा घेऊन प्रवाशी ऊन ,पाऊस ,यापासून स्वताचे संरक्षणासाठी थांबतात .मुक्रमाबाद शहरात होत असलेल्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे सुरु आहे.
राष्ट्रीय राज्य मार्गावर देगलूर– उदगीर मुक्रमाबाद बसस्थानक म्हणजे अनेक समस्यांनी ग्रासलेले बसस्थानक गैरसोयीचे ठिकाण आहे. बड्या बड्या राजकीय नेत्याने स्वताचे पाठ स्वथाच थापटून घेतात,ही अवकळा बसस्थानक दाखवित आहे.
याचा परिणाम जनसामान्यां नागरिकांना मानसिक ञास होत असेल याची कल्पना नेते मंडळीना व प्रशासनाला काहीच देणे घेणे नाही. या बसस्थानकावर दिवसभर दुचाकी व चारचाकी या वाहाने बिनदिक्कत वावर करून बिनदिक्कत गाणे वाजविने याबाबत यावर कोणाचाही वचक नसल्याचे दिसून येते आहे.
बसस्थानकावर वाहने लावून वाहनधारक तासनतास गायब होतात. याचा बसप्रवाशांना ञास होत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. व नविन बसस्थानक झाले पाहिजे असे सवाल नागरीक उपस्थित करतात. हे शहर निजाम कालीन तालुका म्हणुन परिचित आहे. या शहराला जवळपास ४० ते ५० गावाचे जनसंपर्क आहे. तसेच या शहरात दैनंदिन व्यवहारासाठी, दवाखाना, बँक, व्यापार यासह अनेक कामासाठी दररोज शेकडो नागरिकांची रहदारी होते, यामुळे अनेक नागरिकांना प्रवास करण्यासाठी शहरात बसची वाट पाहत बसावे लागत आहे. मुक्रमाबाद येथील शासकीय जागा संबंधित प्रशासनाने संपादित करून नूतन बसस्थानक व प्रशस्त इमारत करून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा शिव सेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जनआंदोलन करावे लागेल…
– मन्मथ खंकरे , शिव सेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)