सोलापूर- येथील नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन ‘रेन्बो 2026’ मध्ये भव्य संगीत मैफलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध गायक गुराशीष सिंग व गायिका प्राची वैद्य यांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी आयोजन करण्यात आले होते. या संगीत मैफिलीत लोकप्रिय गाण्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ कदम व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राशिद बानेवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे, उपप्राचार्य डॉ. एस.एस. मेतन व डॉ. व्ही.के.पत्की उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक समन्वयक डॉ. एस.एस.जहागीरदार व डॉ.पी.ए.उबाळे, प्रा. शिल्पा नेवाळे तसेच सांस्कृतिक विद्यार्थी सचिव अनस पठाण व टीम यांनी विशेष परिश्रम घेतले. नियोजनबद्ध आयोजन, समन्वय व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
या संगीत मैफिलीमुळे विद्यार्थ्यांना सांस्कृतिक क्षेत्रात आपले कौशल्य सादर करण्याची उत्साह वाढला असून हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या सांस्कृतिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
























