कळंब / धारशिव – तालुक्यातील आडसुळवाडी, भोगजी, पिंपळगाव, डोंगरेवाडी, पारा मार्गे अहिल्यानगर मुंबई जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 236 ची अत्यंत दुरावस्था झाल्याने वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावे लागत असुन या रस्त्याने जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
विशेष म्हणजे हा राष्ट्रीय महामार्ग लातूर तांदुळजा शिराढोण कळंब आडसुळवाडी भोगजी पिंपळगाव डोंगरेवाडी पारा आदी मार्गाने अहिल्यानगर मुंबई जातो तरी रस्ते प्रकल्प उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून सुधारणा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक बेजार झाले असून अपघाचे प्रमाण वाढले आहे तरी प्रशासकीय अधिकारी यांनी लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदिप लांडगे यांनी दिला आहे.

















