लोहारा / धाराशिव – लोहारा शहरातील नगरपंचायत कार्यालयाला क्रीडांगण व खेळाचे मैदान व खेळ साहित्याकरिता एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
नगराध्यक्षा वैशाली खराडे यांनी या निधीचा इतर कामाकडे वर्ग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून हा निधी नगराध्यक्षा आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आर्थिक फायद्याच्या प्रलोभानातून मर्जीतील लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी वापरू पाहत असल्याचे आरोप माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आयुब शेख यांनी केले आहेत, लोहारा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून सुमारे २५ ते ३० हजार लोकसंख्या असलेले शहर आहे, येथे दोन महाविद्यालय व माध्यमिक विद्यालये व जिल्हा परिषद केंद्रीय शाळा असून दररोज शेकडो विद्यार्थी भरारी घेत आहेत, शिवाय व्यायमासाठी योग्य मैदानाच्या अभावामुळे वंचित आहेत.
तालुक्याचे क्रीडांगण हे तालुक्यातील जेवळी येथे आहे, शहरातील नागरिकांना मात्र तालुका असुन जागे अभावी क्रीडांगण बनू शकले नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल शहरासह खेडे गावातील क्रीडा विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या असतांना देखील क्रीडांगण नसल्याने विध्यार्थ्यांतुन नाराजी व्यक्त जात आहे, अशा स्थितीत शासनाकडून प्राप्त झालेला निधी शहरातील ओपन स्पेस किंवा नगरपंचायतच्या मालकीच्या जागेवर गुणवत्ता पूर्वक क्रीडांगण उभारण्यासाठी वापरण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात आयुब शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून निधी वर्गीकरनाची मागणी केली आहे.




















