Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

१५ वी राज्यस्तरीय इव्हकॉन २०२५ परिषद संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
November 11, 2025
in marathwada
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


छत्रपती संभाजीनगर : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) वुमन डॉक्टर विंगतर्फे आयोजित १५ वी राज्यस्तरीय इव्हकॉन २०२५ परिषद छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडली. तीन दिवस चाललेल्या या परिषदेचे उद्घाटन राज्याध्यक्ष डॉ. संतोष कदम यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्यास राज्य सचिव डॉ. अनिल आव्हाड, माजी अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, आयपीएस डॉ. अपराजिता अग्निहोत्री, जिल्हाध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर, सचिव डॉ. योगेश लक्कस आणि महिला डॉक्टर विंगच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. संतोष कदम म्हणाले, “आयएमए ही डॉक्टरांच्या हक्कांची आणि सुरक्षेची भक्कम ढाल आहे. फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात आयएमएने उभारलेला आवाज संपूर्ण राज्यभर दुमदुमला आणि सरकारला एसआयटी स्थापन करावी लागली. महिला डॉक्टरांवरील अन्याय आयएमए सहन करणार नाही.” त्यांनी राज्यातील २३० शाखा आरोग्य जनजागृती, रक्तदान, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे नमूद केले.

जिल्हाध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर म्हणाले, “इव्हकॉनमुळे राज्यभरातील महिला डॉक्टरांना एकत्र येऊन ज्ञान, अनुभव आणि नेतृत्वगुणांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळते. छत्रपती संभाजीनगर शाखेला या वर्षी यजमानपद मिळणे हा आमच्यासाठी सन्मान आहे.”

मुख्य पाहुण्या आयपीएस डॉ. अपराजिता अग्निहोत्री यांनी महिला डॉक्टर हे समाजातील सर्वांत संवेदनशील आणि जबाबदार घटक असल्याचे सांगत स्वसंरक्षण आणि मानसिक आरोग्य जपण्यावर भर दिला. त्यांनी महिलांविरुद्ध वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी समाजात जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले.

माजी अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी आयएमएने डॉक्टरांना व्यावसायिक सुरक्षा दिल्याचे सांगत युवा डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणावर संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. राज्य सचिव डॉ. अनिल आव्हाड यांनी आयएमएच्या डिजिटलायझेशन, प्रशिक्षण कार्यशाळा आणि युवा डॉक्टरांसाठी तयार करण्यात येत असलेल्या नव्या उपक्रमांची माहिती दिली.

परिषदेदरम्यान राज्यातील पुरग्रस्त भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा, तसेच पेपर व पोस्टर सादरीकरणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहभागींचा गौरव करण्यात आला.
यावेळी बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट ऐवजी महाराष्ट्र नर्सिंग होम अॅक्ट लागू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून तो लवकर मंजूर होण्याची अपेक्षा असल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली.

Post Views: 56
Previous Post

पिच्छीतील नवरंग हे नव ग्रहाचे प्रतिक – आचार्य प्रणामसागरजी महाराज

Next Post

क्रीडांगण निधीचा गैरवापर थाबवण्याची राष्ट्रवादीची मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

क्रीडांगण निधीचा गैरवापर थाबवण्याची राष्ट्रवादीची मागणी

ताज्या बातम्या

लेह-लडाख येथे सांगोल्यातील तरुणाचा अपघाती मृत्यू

लेह-लडाख येथे सांगोल्यातील तरुणाचा अपघाती मृत्यू

June 4, 2026

सांगोला महाविद्यालयात सेवानिवृत्ती निमित्त तिघांचा सपत्नीक सत्कार

June 4, 2026
शहरातील सुमारे ७० ते ८० टक्के नाला सफाई पूर्ण 

शहरातील सुमारे ७० ते ८० टक्के नाला सफाई पूर्ण 

June 4, 2026

सांगोल्यात पावसाची हजेरी, नागरिकांची उकाड्यापासून सुटका

June 4, 2026

विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात बंडखोरी करणाऱ्या रमेश बारसकर, धनंजय डिकोळे आणि महेश साठेंची माघार

June 4, 2026

पालकमंत्री गोरे म्हणाले मी एकटा बस आहे लावा ताकत #solapurnews #viral

June 4, 2026

हक्काच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांना व्हावे लागले अर्धनग्न

June 4, 2026

आंदोलनाची वेगळी स्टाईल थेट टाकले दंडवत

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893306

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697