आगामी निवडणुकीत परिवर्तन घडविण्याची गरज : रामेश्वर जंजाळ
देळेगव्हाण येथुन प्रारंभ तर पारध येथे ४ सप्टेंबर रोजी समारोप
भोकरदन : केंद्र आणि राज्य सरकारच्या मनमानी धोरणामुळे घरगुती सिलेंडर, पेट्रोल, इलेक्ट्रिक बिल, यांचे गगनाला भिडलेल्या दरामुळे जनता मेटाकुटीस आली असून शेतकर्यांच्या मालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरीही कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाने आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने युवानेते रामेश्वर जंजाळ यांनी केले.
भोकरदन विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्यांसह शेतकर्यांच्या समस्या जाणून घेेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने युवानेते रामेश्वर पाटील जंजाळ यांनी जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथून २१ ऑगस्टपासुन महापरिवर्तण यात्रेस प्रारंभ केला आहे. या माध्यमातून शेतकर्यांसोबत संवाद करुन समस्या जाणून घेण्यात येत आहे.
भोकरदन विधानसभा क्षेत्रात १५ दिवसात प्रत्येक गावोगावी व घरोघरी जावुन महिला शेतकऱ्यांचा समस्या जाणून घेत आहे. ४ सप्टेंबर रोजी पारध येथे समारोप करण्यात येणार आहे. या महापरिवर्तण यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या विविध समस्या जाणून घेऊन त्याचा शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती रामेश्वर जंजाळ यांनी दिली. या यात्रेत रामेश्वर जंजाळ व त्यांचे सहकारी गावा गावात मुक्काम करत आहे.
पुढे बोलतांना जंजाळ म्हणाले की, आज जीवनावश्यक वस्तूचे प्रचंड भाव वाढवून महागाईने सर्वांचे कंबरडे मोडले आहे. ४१० रुपयाला मिळणारे सिलेंडर आता ८५० रुपयाला विकत घ्यावे लागत आहे. पेट्रोल डिझेलचे भाव आकाशात भिडले आहेत. ६० रुपये लिटरचे डिझेल ९५ रुपये वाढ झाली आहे. शिक्षणाची फी वाढली. जीवनाश्यक वस्तुंवर ५ टक्के जीएसटी टॅक्स लावला जात आहे. बेरोजगाराची थट्टा लावली उच्च शिक्षित तरुणांसाठी कंत्राटी पद्धत सुरू करून शासन ठेकेदार बनले. शाळा, महाविद्यालय, बस, रेल्वे याच खाजगीकरण सुरू झाले. ग्रामीण भागात दवाखाने नाही आणि दवाखाना आहे तर डॉक्टर नाही अशी विदारक परिस्थिती आपल्या मतदार संघामध्ये दिसून येत आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रामेश्वर जंजाळ यांनी केला.
बाॅक्स…निर्धार परिवर्तनाचा….!
भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदार संघातील हुकूमशाही मोडीत काढून शेतकरी, कष्टकरी, महिला व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महापरिवर्तण यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून आम्ही दररोज पंधरा ते वीस गावात भेट देऊन शेतकऱ्यांसह महिलांच्या समस्या जाणून घेण्यात येत आहे. भोकरदन विधानसभा मतदारसंघातील हुकूमशाही मोडीत काढण्याचा आणि शेतकरी, कष्टकरी, सर्व सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा उद्देश आहे.
-रामेश्वर जंजाळ
भोकरदन