सोलापूर – निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ऑपरेशन सिंदूर गीतावर बहारदार नृत्य सादर पालकांमध्ये देशभक्ती जागवल्या. दहशतवादाला चोख प्रत्युत्तर आणि सैनिकांच्या पराक्रमाची गाथा यातून मांडल्याने ‘भारत माता की जय’ व ‘ वंदे मातरम् ‘या जय घोषानी सभागृह दणाणून गेला.नुकतेच हुतात्मा स्मृती मंदिर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्लिश मिडीयम स्कूलचे स्नेहसंमेलन पार पडले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर बहारदार कलाविष्कार सादर करुन पालकांचे मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते.
यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार आदी मान्यवरांच्या हस्ते श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व स्टेज पूजन करण्यात उदघाटन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी गणपती गीत,वेलकम गीत,देवी गीत,शेतकरी गीत, सुनौ गौर से दुनिया वालो ,धनगर गीत , सावित्रीबाई फुले (एकांकिका),तेलुगू गीत,कोळी गीत, कृष्णा थीम,गोरा कुंभार थीम,छावा गीत,पप्पा थीम,अग्नी, कांतारा गीत,शिव तांडव,रिमिक्स गीत,ऑपरेशन सिंधूर आदी मराठी, हिंदी, तेलुगू, इंग्रजी गीतांवर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी जोगीपेठकर यांनी केले तर कीर्ती बुरा यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजश्री कोळी, संगीता कुडक्याल, योगिता नरोणे,वैष्णवी साठे, अश्विनी गंगुल,संतोष प्रचंडे,संपदा कदम,ज्योती ढगे, कांचन आरकाल आदींनी परिश्रम घेतले.


















