करकंब : न्यू इंग्लिश स्कूल करकंब तालुका पंढरपूर येथे बालआनंद बाजार व खाऊगल्लीचे आयोजन करण्यात आले होते.या आनंदबाजारचे उद्घाटन संस्था अध्यक्ष संजीव कुमार मेहत्रे,सचिव अविनाश देवकते,मुख्याध्यापक पर्यवेक्षक,शिक्षक,पालक प्रतिनिधी मधुकर खारे,विठ्ठल सलगर,स्वामी,लक्ष्मी खारे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या चव,आनंद आणि शिक्षणाचा मेळा या उपक्रमाद्वारे बालआनंद बाजारमध्ये ताजी फळे,भाजीपाला,खेळणी,चहा कॉफी तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते.या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना खरेदी,विक्री कशी करावी?आर्थिक नियोजन कशाप्रकारे केले पाहिजे याचे ज्ञान प्राप्त व्हावे हा या आनंद बाजार आयोजित करण्याचा मुख्य हेतू होता.
बँकांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीचा व्यवहार कसा चालतो हे विद्यार्थ्यांना समजावे यासाठी प्रतिकात्मक बँकेची ही उभारणी करण्यात आली होती.याप्रसंगी विद्यार्थी,शिक्षक,शिक्षिका,पालक गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या स्टॉलवरील वस्तूंची खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत येथील विविध अन्नपदार्थांचा आस्वाद घेतला.या आनंद बाजारमध्ये हजारो रुपयांची उलाढाल झाली.

















