करकंब : केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता ८वीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच एनएमएमएस परीक्षेमध्ये न्यू.इंग्लिश स्कूल करकंब ता.पंढरपूर या प्रशालेतील अनमोल कवडे १२८ गुण,मानसी भोसले १२०,आसावरी शेटे १०८,अमृता शिरसठ १०२,संकेत जानकर ९९,रुद्र भोरे ९८,अरसलान कोरबू ९६,स्नेहल पांढरे ९२,रत्नदीप चव्हाण ९१,वैभवी मेहकर ८८,रणजीत व्यवहारे ८४,सानिका केदार ८३,अनघा देवकते ७७,श्रेया कवडे ७६, तेजस्विनी हेगडकर ७६,गौरी सुरवसे ७२ या विद्यार्थी,विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजीवकुमार म्हेत्रे सर,सचिव अविनाश देवकते सर,स्कूल कमिटी अध्यक्ष प्रशांत वेळापूर सर,मुख्याध्यापक श्रीकांत लऊळकर,शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,पालक यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
























