अक्कलकोट – अक्कलकोट नगरीचे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यावेळी नगर परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अक्कलकोट नगरीचे माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांना पुष्पहार घालून शाल , श्रीफळ देऊन माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युवानेते तुषार गायकवाड , सागर सुतार आदींसह युजी मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















