माजी आमदार नरसिंग मेंगजी यांना पत्नीशोक
सोलापूर , 3 जुलै (हिं.स.) सोलापूरचे माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या पत्नी पद्मावती मेंगजी (62) यांचे निधन झाले आहे. पद्मावती नरसिंग मेंगजी यांचे आज बुधवार, 3 जुलै रोजी सकाळी 11.58 वाजता दुःखद निधन झाले. आज सायंकाळी 6 वाजता वसंत विहार परिसरातील त्यांच्या निवास स्थानापासून अंत्ययात्रेस सुरुवात होईल. सहस्त्रार्जुन वैकुंठधाम, सोलापूर येथे अंत्यविधी होणार आहे.पद्मावती मेंगजी यांच्या मागे पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.