सांगोला – मंगळवार दि.१३ जानेवारी रोजी सांगोला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी आनंदा माने यांच्या अध्यक्षतेखाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे संपन्न झाली.
उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षा तर्फे नितीन विठ्ठल इंगोले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड तसेच स्वीकृत सदस्य पदासाठी शिवसेना पक्षा तर्फे विजय वसंत इंगोले व सांगोला शहर विकास आघाडी तर्फे तनुजा बाळासाहेब एरंडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करण्यात आलेले नामनिर्देशनपत्र वैध असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले असल्याने त्यांना नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती झाली असल्याचे पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष आनंदा माने यांनी घोषित केले.
यावेळी मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, सर्व नगरसेवक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, शहरातील नागरिक, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















