निमगाव – माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद गणाचे व गटाचे आरक्षण 13 आकटोंबर रोजी जाहीर झाले.आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक ईच्छुकांची मोठी गोची झाल्याचे पाहावयास मिळत आहे.निमगाव जिल्ह्य परिषद गटाची गतवर्षी नव्याने निर्मीती झाले.यामधुन पहिल्यांदा निवडुन येण्याचा मान भाजपच्या ज्योती पाटील यांनी मिळविला.आता या निमगाव जिल्हा परिषद गटाची यंदा पुन्हा पुर्नर रचना झाली आहे. यामध्ये निमगाव पंचायत समिती गण व गोरडवाडी पंचायत समिती गण अश्या दोन पंचायत समिती गणाचा मिळुन निमगाव जिल्हा परिषद गट झाला आहे.यंदा निमगाव जिल्हा परिषद गटात निमगावकरांना जिल्हा परिषद सदस्य होता येणार नाही .कारण याठिकाणी यंदा आरक्षण ओबीसी महिला असल्यामुळे धनगर समाजातील महीलाच जिल्हा परिषद सदस्य असेल मग ती खुडुस, गोरडवाडी,तरंगफळ, झिंजेवस्ती यासह इतर धनगर समाज असणाऱ्या गावातील असेल .या ठिकाणी या जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून पैलवान रावसाहेब मगर यांचे चिरंजीव दत्ता भैया मगर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी केली होती माञ आरक्षणामुळे त्यांची मोठी गोची झाली आहे.ते आता निमगाव पंचायत समिती गणातुन आपले नशीब अजमावणार का याकडे लक्ष लागले आहे.
कारण हा पंचायत समिती गण सर्व साधारण प्रवर्गासाठी आहे. तसेच या ठिकाणी भाजपचे नेते के के पाटील याच . मतदार संघात येतात त्यांनाही यावेळी जिल्हा परिषदेला आरक्षणामुळे उभा राहता येणार नाही.त्यांनी तिन वेळा पंचायत समिती सदस्य म्हणून नियोजन बद्ध चांगले काम केले आहे.ते पुन्हा एकदा पंचायत समितीला उभा राहणार का ,दुसऱ्याला संधी देणार याकडे लक्ष लागले आहे.गोरडवाडी पंचायत समिती गण हाही स्ञी साठी राखीव आहे.यामुळे याठिकाणी या जिल्हा परिषद व गोरडवाडी पंचायत समिती ह्या दोन्ही ठिकाणी महीलाच नेतृत्व करणार हे निश्चित झाले आहे.या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व भारतीय जनता पक्ष यांच्या मुख्य लढत असली तरीही अपक्ष सुद्धा लढु शकतात त्यावेळेसच चित्र स्पष्ट होईल.
पण सध्या या जिल्ह् परिषद व पंचायत समिती गणात जोरदार लढत होईल हे नक्कीच आहे.सोशल मिडीयावर भावी जिल्ह्य़ा परिषद सदस्य म्हणून मिरविणारयाला आरक्षणामुळे चांगलीच चपराक बसली आहे.यामुळे जिल्हा परिषद सदस्य होणारयावर आरक्षणामुळे पंचायत समिती सदस्य होण्याची नामुष्की ओढवली आहे.
या जिल्हा परिषद गटात धनगर व मराठा समाजाचे मोठे प्राबल्य आहे. पण सध्या या मतदारसंघात माजी सभापती मच्छिंद्र आबा ठवरे,के के पाटील, सद्गुरू साखर कारखान्याचे व्हा चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, रावसाहेब मगर,भजनदास चोरमले,माजी पंचायत समिती सदस्य दताञय जावळे,अरूण मदने,डाॅ तुकाराम ठवरे,सुरेश तरंगे,शिवराज पुकळे, संजय देशमुख ,झिंजेवस्तीचे माजी सरपंच विठ्ठलराव मदने, कुसमोडचे माजी सरपंच तुषार लवटे,महावीर धायगुडे, चांदापुरीचे केशवराव पाटील, यासह अनेक दिग्गज नेते या जिल्हा परिषद गटात असुन यांच्या त्या पक्षासाठी भुमिका निर्णायक राहणार हे निश्चित आहे.