धाराशिव : हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी (रहे.) यांच्या ७२१ व्या उर्स सोहळ्यानिमित्त दि. ०५ जानेवारी रोजी धाराशिव (उस्मानाबाद) येथील दर्गा शरीफवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी श्रद्धापूर्वक चादर अर्पण केली.
उर्स निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दर्गा शरीफवर हजेरी लावत चादर अर्पण करून सर्वांच्या सुख, शांती व समृद्धीसाठी दुवा मागितली. यावेळी प्रदेश सरचिटणीस- मसूद शेख, मा.नगरसेवक- बाबा मुजावर, समाज सेवक -खादर खान, मोहसीन शेख,रोहित बागल, सर्फराज कुरेशी, असलम शेख. देवकते साहेब.संतोष भावसार, नुवेद शेख.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी (रहे.) यांच्या उर्सनिमित्त दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होत असून धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा व भाईचाऱ्याचा संदेश या माध्यमातून दिला जातो. उर्स काळात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी उर्स सोहळ्याचे महत्त्व विशद करत सर्वधर्म समभाव, शांतता व एकतेचा संदेश समाजात पोहोचविण्याचे आवाहन केले. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

























