बार्शी – विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत असताना आपल्या गावच्या मातीबद्दल उत्कट प्रेम असणाऱ्या भूमिपुत्रांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जन्मभूमी प्रतिष्ठानच्यावतीने आज विधायक उपक्रमांची मालिका कायम ठेवत ग्रामउद्धारासाठी प्रयत्न करणारे संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रामस्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन लोकशिक्षण करणारे प्रबोधनकार संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ ग्रामस्थ रामलिंग कामिनी यांनी केले. यावेळी माजी सरपंच ज्ञानेश्वर भालेकर यांनी गाडगे बाबांच्या कार्याला उजाळा दिला व गावासाठी एकदिलाने एकत्र येऊन सामाजिक समतेचा आदर्श निर्माण करत सर्वांना बरोबर घेऊन सत्कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र चॅम्पियन सचिन धस, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अण्णासाहेब पाटील, ज्येष्ठ नागरिक जयराम सुतार, वन अधिकारी सुलतान शेख, धनाजी वाघमोडे, दादा कसबे, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुजारी पांडुरंग गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जन्मभूमी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेत राहुल धस यांनी आपले प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आबा कामिनी, श्रीकांत कामिनी, संदीप वाघमारे, मनोज कोकाटे, सोहेल शेख, राम गरड,सुधीर कुलकर्णी, गणेश पवार यांनी परिश्रम घेतले.
























