तभा फ्लॅश न्यूज/माहूर : श्री दत्तात्रेय शिखर संस्थान श्री क्षेत्र माहूरगड येथे ०३ ते १० ऑगस्ट या कालावधीत नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन यात्रोत्सव ०३ ते १० ऑगस्ट या कालावधीत साजरा केला जाणार असून, या यात्रेचे विशेष धार्मिक आकर्षण असलेला पंचक्रोशी परिक्रमा वेढा ८ ऑगस्ट रोजी निघणार आहे. त्यानिमित्ताने दि.२८ जुलै रोजी जिल्हाधिकारी, नांदेड राहुल कर्डीले तसेच अविनाश कांबळे उपविभागीय अधिकारी, किनवट यांचे मार्गदर्शनाखाली मुगाजी काकडे तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी माहुर यांचे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात सर्व संबधित विभाग प्रमुखांची यात्रा नियोजन बैठक घेण्यात आली.
यावेळी सभेचे अध्यक्ष तहसीलदार काकडे यांनी परिक्रमा यात्रेतील प्रशासकीय नियोजन व्यवस्थेबाबत विभाग प्रमुखांकडून यात्रा व्यवस्था व नियोजन बाबतीत आढावा घेत मार्गदर्शन केले.तर उपस्थित संबंधित विभाग प्रमुख वा त्यांचे प्रतिनिधींनी परिक्रमा यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोईसुविधा पुरविण्यासाठी आपापल्या विभागाच्यावतीने करण्यात येत असलेल्या व्यवस्थेच्या तयारी बद्दल सभागृहास माहिती दिली.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून यात्रे दरम्यान माहूरगड, अनुसया माता मंदिर व रेणुका माता मंदिर येथे आरोग्य पथक नेमण्यात आले असून, मातृतीर्थ येथे आरोग्य कॅम्प ठेवण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.यात्रे दरम्यान दि.०८ व ०९ ऑगस्ट रोजी खाजगी वाहने गडावर जाणार नाहीत.पार्किंग व्यवस्था माहूर गावात करण्यात आलेली आहे. भक्तांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने ६० बसेसची व्यवस्था केलेली आहे.अशी माहिती माहूर आगाराकडून देण्यात आली.नगर पंचायतला पार्कींग, लाईटिंग,फिरते स्वच्छतागृह, व्यवस्था करणे बाबत जबाबदारी देण्यात आली. तसेच विद्युत वितरण कंपनीला २४ तास लाईन ठेवणे बाबत निर्देशित करण्यात आले.
वनविभागामार्फत २८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.तर ,पोलीस विभागामार्फत पुरेसा बंदोबस्त व चेकपोस्ट ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. तसेच दत्तशिखर संस्थान मार्फत शिखर गडावर व अनुसया माता मंदिर येथे सुरक्षा, आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, तसेच अन्नछत्राची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती संस्थानकडून देण्यात आली.
सर्व संबंधित विभाग प्रमुखांशी परिक्रमा वेढा यात्रोत्सव व्यवस्था नियोजनाच्या इत्यंभूत माहितीचा आढावा घेऊन करण्यात आलेल्या साधक चर्चेनंतर सर्वांना आपापली जबाबदारी नेमून देण्यात आली.यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी मुगाजी काकडे यांनी, ” सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी कोणत्याही प्रकारची कामात कुचराई न करता प्रामाणिकपणे पार पाडून परिक्रमा यात्रा शांततेत आणि निर्विघ्नपणे यशस्वीरीत्या पार पाडण्याठी सहकार्य करावे” , असे आवाहन केले.
सदर बैठकीस आन्येबोईनवाड सहा. पो.नि., आर.बी शेंडे उपकार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.क.,डॉ.आर.डी.
माचेवार तालुका आरोग्य अधिकारी,जी.एन. नाईक, व्यवस्थापक श्रीदत्तशिखर संस्थान,डि.के. भिसे. उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम, उपविभाग, वाय. एम. साबळे, व्यवस्थापक श्रीरेणुकादेवी संस्थान,चंद्रकांत भोपी, विश्वस्त श्री रेणुकादेवी संस्थान,डॉ. के.बी. वाघमारे, अधिक्षक, ग्रा.रु.,एस.एस. गजलवाड, कार्यालयीन अधिक्षक, न.पं.,आर.एन. लोखंडे विस्तार अधिकारी, पं.स.,सी.आर. समर्थवाड. म.रा. मार्ग परिवहन महामंडळ, वन परिक्षेत्र अधिकारी,कैलास जेठे,नायब तहसिलदार,
सिध्दार्थ कुलदिपके, सहा. महसुल अधिकारी, तहसिल कार्यालय,एस. के. साळसुंदर मंडळ अधिकारी,चंद्रकांत बाबर ग्राम महसुल अधिकारी,एस.एल. सातपुते. महसुल सहाय्यक, तहसिल कार्यालय,आदी माहूर येथील विविध विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांची उपस्थिती होती.