पुणे – पुणे हवाई दल तळाच्या वतीने येत्या 2 नोव्हेंबर, 2025 रोजी सकाळी 5.45 वाजता लोहगाव येथील क्रीडा मैदानावर “सेखों भारतीय हवाई दल मॅरेथॉन” च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाचे एकमेव परमवीर चक्र (पीव्हीसी) सन्मान प्राप्त फ्लाइंग ऑफिसर निर्मल जित सिंग सेखों यांच्या शौर्य, धैर्य आणि सर्वोच्च बलिदानाला श्रद्धांजली म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या मॅरेथॉनचा उद्देश भारतीय हवाई दलाच्या अदम्य उत्साहाचे प्रदर्शन करणे आणि सहभागींमध्ये तंदुरूस्ती, देशभक्ती आणि सौहार्द वाढवणे आहे. या कार्यक्रमात पुणे आणि परिसरातील सेवारत कर्मचारी, माजी सैनिक, कुटुंबे आणि नागरिक सहभागी होणार आहेत.

‘टच द स्काय विथ ग्लोरी’ या हवाई दलाच्या ब्रीदवाक्याला अनुसरत आयोजित केलेल्या या मॅरेथॉनचे आयोजन 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी. या तीन श्रेणींमध्ये करण्यात आले आहे.
हा उपक्रम देशभरातील 61 हवाई दल तळांवर एकाच वेळी आयोजित होणाऱ्या सेखों इंडियन एअर फोर्स मॅरेथॉनचा एक भाग आहे.
ज्यांना या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी अधिकृत संकेतस्थळ www.sekhoniafmarathon.in द्वारे ऑनलाइन नोंदणी करता येईल तसेच अधिक माहितीसाठी +91 95115 80588 या मोबाइलवर आयोजकांशी संपर्क साधता येईल.




















