Wednesday, July 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माय भारत’ने पार केला दोन कोटी नोंदणीचा टप्पा

तरुण भारतbyतरुण भारत
October 29, 2025
in india
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्‍ली – युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने युवा सहभागाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘मेरा युवा भारत’ (माय भारत) अंतर्गत 2 कोटींहून अधिक नोंदणी साध्य करत मोठा टप्पा गाठला आहे. हा ऐतिहासिक टप्पा विकसित भारत @2047 च्या दिशेने देशाच्या सामूहिक प्रवासात भारतातील युवा वर्गाचा वाढता उत्साह आणि सहभाग प्रतिबिंबित करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय एकता दिनी सुरू केलेला माय भारत हा उपक्रम भारताच्या सर्वात मोठ्या युवा-केंद्रित डिजिटल परिसंस्थांपैकी एक म्हणून वेगाने विकसित झाला आहे. 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांसाठी तंत्रज्ञानावर आधारित, वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून डिझाइन केलेले हे व्यासपीठ, भारताच्या ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील तरुण नागरिकांना एकमेकांशी जोडते आणि त्यांना शिकण्यासाठी, सेवा करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या विविध संधींमधून नेतृत्व करण्यासाठी सक्षम बनवते.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले: “2 कोटी नोंदणीचा टप्पा ओलांडणे हा देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. यामधून राष्ट्र उभारणीत सहभागी होण्याचा भारतातील तरुणांचा उत्साह, ऊर्जा आणि दृढनिश्चय प्रतिबिंबित होतो. माय भारत,  युवा भारताच्या हृदयाचे स्पंदन बनले  असून, या ठिकाणी उत्साह आणि संधी, तसेच सेवा आणि उद्दिष्ट एकत्र येतात.”

युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे म्हणाल्या, माय भारत आपल्या तरुणांना आकांक्षांना कृतीमध्ये परिवर्तित करण्यासाठी सहाय्य करत आहे. प्रत्येक नवीन नोंदणी, एक प्रबळ, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी राष्ट्र घडवण्यासाठी पुढे आलेल्या युवा भारतीयाचे प्रतिनिधित्व करते.”

आपल्या स्थापनेपासूनच ‘माय भारत’ ही युवकांच्या सहभागाची एक ऊर्जामय परिसंस्था म्हणून उदयाला आली आहे. व्हॉलंटियर फॉर भारत आणि एक्सपिरिअन्शियल लर्निंग प्रोग्राम (ईएलपी) यासारख्या उपक्रमांनी तरुणांना स्वतःमध्ये नेतृत्व गुण आणि रोजगारक्षमता यासारखी कौशल्ये विकसित करण्याबरोबरच समाजासाठी अर्थपूर्ण योगदान द्यायला सक्षम बनवले आहे.

या व्यासपीठाची पब्लिक प्रोफाइल आणि सीव्ही बिल्डर यासारखी नवोन्मेशी वैशिष्ट्ये तरुणांना आपली कामगिरी प्रदर्शित करण्यासाठी, समवयस्कांशी संपर्क साधण्यासाठी आणि विकासाच्या नवीन संधी शोधण्यासाठी सक्षम बनवतात. अलीकडेच सादर केलेल्या क्विझ आणि निबंध मॉड्यूल्समुळे भागीदार संस्थांनी आयोजित केलेल्या ज्ञान-आधारित आणि सर्जनशील उपक्रमांमध्ये सहभाग वाढला आहे.

माय भारत हे विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, विकसित भारत युवा कनेक्ट, विकसित भारत पदयात्रा आणि नशा मुक्त युवा यांसारख्या राष्ट्रीय युवा कार्यक्रमांचे केंद्र बनले असून, यामध्ये लाखो युवा भारतीय उत्साहाने सहभागी झाले आहेत.

14.5 लाखांहून अधिक स्वयंसेवेच्या संधी निर्माण करून, माय भारत 16,000 पेक्षा जास्त युवा क्लब सदस्यांच्या आणि 60,000 पेक्षा जास्त संस्थात्मक भागीदारांच्या विशाल नेटवर्कला जोडते. यात सरकारी विभाग, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांचा समावेश आहे. रिलायन्स आणि इतर कॉर्पोरेट भागीदारांसारख्या प्रमुख संस्थांच्या सहकार्यामुळे प्रभावी कार्यक्रम आणि बूटकॅम्प तयार करण्यामध्ये सहाय्य झाले असून, ते तरुणांच्या उर्जेला नागरी आणि समाजिक उपक्रमांशी जोडते.

Post Views: 64
Previous Post

पुणे हवाई दल तळाच्या वतीने “सेखों भारतीय हवाई दल मॅरेथॉन 2025” च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन

Next Post

पर्यावरणस्नेही बसेसमुळे सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पर्यावरणस्नेही बसेसमुळे सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

धनश्री प्रवचनमालेला शुक्रवारपासून प्रारंभ; संत कान्होपात्रांच्या अभंगातून उलगडणार भक्तीचे जीवनदर्शन

धनश्री प्रवचनमालेला शुक्रवारपासून प्रारंभ; संत कान्होपात्रांच्या अभंगातून उलगडणार भक्तीचे जीवनदर्शन

July 29, 2026
श्रीसंत गजानन महाराज पालखीचे करकंबमध्ये उत्साहात स्वागत

श्रीसंत गजानन महाराज पालखीचे करकंबमध्ये उत्साहात स्वागत

July 29, 2026
महिला वैद्यकीय अधीक्षकाकडे पाच लाखांची खंडणीची मागणी; दोघांविरुद्ध गुन्हा

महिला वैद्यकीय अधीक्षकाकडे पाच लाखांची खंडणीची मागणी; दोघांविरुद्ध गुन्हा

July 29, 2026

गुरुपौर्णिमे निमित्त दत्तमंदिरात भक्तांची मोठी गर्दी

July 29, 2026

३१ जुलै रोजी सोलापूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

July 29, 2026

संत प्रभाकर महाराज मंदिरात भक्तांची गर्दी

July 29, 2026

खत पुरवठा, काळाबाजार आणि लिंकिंगच्या प्रश्नावर केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका

July 28, 2026
शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

July 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1010542

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!