कंधार (प्रतिनीधी ) नांदेड जिल्हयातील प्रसिध्द आसणारे श्री क्षेत्र उमरज (धाकटे पंढरपूर )येथे श्री कृष्ण जन्मोत्सव व मठसंस्थानचे पहीले मठाधीपती श्री संत सदगुरु नामदेव महाराज यांच्या २५2 वा जन्मोत्सव सोहळ्या निमित्त दि.20 आॕगस्ट ते दि. 27 आॕगस्ट पर्यंत आखंड हारीनाम सप्ताह सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहीती मठाधीपती श्री संत महंत एकनाथ गुरु नामदेव महाराज यांनी एका प्रसिद्धी पञकाद्वारे दिलेली आहे नांदेड जिल्हासह महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश ,कर्नाटक आदी राज्यातील मोठ्याप्रमाणात भक्तगण आसणारे श्री क्षेत्र (धाकटे पंढरपूर )उमरज येथील श्री संत नामदेव महाराज देवस्थान चे मठाधीपती मंहत श्री एकनाथ गुरु नामदेव महाराज यांच्या अयोजनातुन श्री कृष्ण जन्मोत्सव व मठसंस्थानचे पहीले मठाधीपती श्रीसंत सदगुरु नामदेव महाराज यांचा यांचा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने धाटामाटात साजरा करण्यात येतो .
दिनांक 20 आॕगस्ट रोजी पासुन प्रारंभ होणाऱ्या कार्यक्रमांची माहीती अयोजकाने प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रसिद्धी पञका प्रमाणे दैनदिन कार्यक्रम पुढिल प्रमाणे होणार आहेत पहाटे ४ ते ६ वाजता काकडा भजन ,सकाळी ७ ते ९ वाजता श्रीसंत नामदेव महाराज यांच्या ग्रंथाचे पारायण ,सकाळी १0 ते १२वाजता गाथा भजन ,दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत कथा प्रवक्ते श्री .ह.भ.प. शंकर महाराज लोंढे यांच्या मधुर वाणीतुन श्री संत नामदेव महाराज चरीञ कथा ,सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ ,राञी ८ ते १० वाजता महाराष्ट्रातील नामंकित कीर्तन कार यांच्या मधुर वाणीतुन हरी किर्तन व हरीजागर दिनांक २६ आॕगस्ट रोजी सकाळी १० ते ११ वाजता ॐ नमो नामदेवायनमः या महामंञाचा सव्वा लक्ष नाम जप सकाळी ११ ते ४ वाजता महा आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर व राञी १० ते १२ वाजता श्री गुरु नामदेव महाराज यांच्या समाधिचा महाअभिषेक सह फटाक्यांची अतिषबाजी होणार आसुन प्रारंभ होणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताहात पुढील किर्तनकार यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे
दिनांक २० आॕगस्ट रोजी किर्तनकार श्री ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर (गंगाखेड) .दिनांक २१ आॕगस्ट रोजी श्री ह.भ.प.अर्जुन महाराज मोटे,22 आँगस्ट रोजी श्री ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तर ,२३ आॕगस्ट रोजी श्री ह.भ.प.संजय महाराज पाचपोर ,२४ आॕगस्ट रोजी श्री ह.भ.प.हरीहर महाराज दिवेगावकर ,२५ आॕगस्ट रोजी श्री ह.भ.प.आक्रुज महाराज साखरे गेवराई ,२६ आॕगस्ट रोजी श्री ह.भ.प.विठ्ठल महाराज धोंडे आळंदीकर यांचे श्री सदगुरु नामदेव महाराज जन्मोत्सव किर्तन राञी १०ते १२वाजता होणार आहे. दिनांक २७ आॕगस्ट रोजी श्री ह.भ.प.गुरुवर्य एकनाथ गुरु नामदेव महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमांची सांगता होणार .या कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील जास्तीत भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आसे आवहान मठाधीपती मंहत श्री एकनाथ गुरु नामदेव महाराज यांनी केले आहे .