वाळूज महानगर (प्रतिनिधी) शहर व एमआयडीसी वाळूज, एमआयडीसी शेंद्रा भागातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत पोलिस आयुक्त यांना पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले आहे. गुन्हे दाखल करूनही संबंधितांकडून अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
याबाबत पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
छत्रपती संभाजीनगर हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर व जिल्हा आहे व तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी म्हणून वाळूज एमआयडीसीचे नाव लौकिक आहे बिडकीन सारख्या डीएमआयसी मध्ये मोठे मोठे उद्योग या जिल्ह्याला लाभत आहेत मात्र हुशार असलेला तरुण वर्ग नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारी कृत्य करताना दिसत आहे अवैद्य धंद्याच्या वर्चस्व वादातून कित्येकांच्या हत्या होताना दिसत आहेत शहर व शहरा लगत असलेल्या गोरगरीब कष्टकरी झोपडपट्टी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात गरीब व कष्टकरी या वसाहती मध्ये राहतात मात्र शिकून बेरोजगार झालेला तरुण दारू व नशेच्या आहारी जाऊन देशोधडीला लागलेले आहेत
कित्येकांना आपले प्राण गमावले कित्येकांचे परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत त्याकरिता एक विशेष पथक तयार करून या अवैद्य धंद्यासह दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी व असे कृत्य करणार्या लोकांवर एम.पी.डी.ए. व तडीपारी सारखी कारवाई करावी जेणेकरून कित्येकांचे परिवार उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. आमच्या निवेदनाचा विचार करून सर्वसामान्यांसाठी न्यायिक भूमिका घ्यावी नसता पँथर्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने लोकशाही मार्गाने विविध प्रकारचे आंदोलने छेडण्यात येतील असा इशारा देण्यात आलेला आहे. निवेदनावर पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सूर्यकांत गंगाधर गाडे, सर्जेराव ठोंबरे, साहेबराव नवतुरे, महेंद्र वाघमारे, विजय दिवेकर, सोमनाथ महापुरे, रंजित साळवे, किशोर जाधव, राकेश साबळे, सचिन वाघमारे, लताबाई थोरात, शशीकलाबाई तिनगोटे, अंकुश वलेकर,मिलिंद जमधडे, अविनाश साठे, राजू निकाळजे, संदीप काळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.