बार्शी – १९ वे राष्ट्रीय जांबोरी २३ ते २९ नोव्हेंबर दरम्यान लखनऊ येथे झालेल्या राष्ट्रीय मेळाव्यामध्ये महाराष्ट्र विद्यालयातील १६ विद्यार्थी महाराष्ट्र संघात सोलापूर जिल्ह्यातून सहभागी झाले.
राष्ट्रीय मेळाव्यामध्ये उद्घाटन समारंभ यामध्ये,उत्कृष्ट लेझीम, इंटिग्रेशन यात्रेमध्ये उत्कृष्ट सहभाग, स्टेट डेमध्ये सहभाग, फिजिकल डिस्प्लेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करत सर्वांची मने जिंकली, तसेच सर्व राज्याचे राष्ट्रीय शोभायात्रा यामध्ये महाराष्ट्र संघामध्ये, सहभाग,तसेच उत्तर प्रदेश पोलीस कक्ष, भारतीय सैन्यदल विविध शस्त्र प्रदर्शन जवळून पाहता आले, ग्लोबल विलेज, ए.आय आय टी हब, एडवेंचर, फनी गेम यामध्ये खूप काही शिकता आले. भारतातील विविध संघामधील उत्कृष्ट बँड पथक संचलन लोकनृत्य सांस्कृतिक आदान प्रदान जवळून अनुभवता आल्या. नियोजन कसे असते याचे उत्तम उदाहरण मेळावा मध्ये शिकता आले. भारतातून या शिबिरासाठी ३५ हजार विद्यार्थी उपस्थित होते. भारताचे राष्ट्रपती, उत्तर प्रदेशचे राज्यपाल व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. विविधतेतून एकता, पर्यावरण संरक्षण, एकमेकांना सहाय्य करणे, स्वच्छतेचे महत्व, देश भावना या सर्व बाबीचे विद्यार्थ्यांना महत्व कळाले.
या मेळावामध्ये आदर्श बोधले, समर्थ राऊत, रणवीर गुंड, वेदांत गव्हाणे, सुखदेव गव्हाणे, पार्थ कोकाटे, संस्कार उपळकर, स्वराज्य चिद्रवार, रीया काटकर, संयमी भोसले, हर्षिता राजमाने, दिव्या जाधवर, शिवांजली खराडे, प्राची शिंदे, श्रावणी हनुमंते, मैथिली राऊत, स्काऊट लीडर योगेश उपळकर व गाईड लीडर वैष्णवी सगट हे सहभागी झाले होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष एन.एन.जगदाळे, सचिव पी.टी.पाटील, सहसचिव ए.पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ्. मीराताई यादव, एस.बी. शेळवणे, सर्व कार्यकारिणी सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी.सपताळे, पर्यवेक्षिका एन.बी.साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


























