सोलापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षक अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना व उर्दू टीचर्स फेडरेशन यांनी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
या संघटनेच्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नागेश गोसावी, राज्य प्रतिनिधी स्वप्नील चाबुकस्वार, संतोष सुतार, विशाल मनाळे, किरण शेळगे, उर्दू टीचर्स फेडरेशनचे अध्यक्ष फझल शेख, उपाध्यक्ष इमरान पठाण उपस्थित होते.



























