तभा फ्लॅश न्यूज/बार्शी : बार्शी बायपास रोडवरील विश्वा मंगल कार्यालयाजवळ वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने पादचारी ठार झाल्याची घटना घडली. उमेश दिगंबर वालुपंते (वय-६०, रा. जुनी चार्ट गल्ली, बार्शी) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
वालुपंते हे मजुरीसोबत फुलांचा व्यवसाय करीत होते. घटनेनंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे नेत असताना रुग्णालयाच्या गेटवरच त्यांचा मृत्यू झाला. फिर्यादी विजय दिगंबर वालुपंते यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश वालुपंते हे पायी जात असताना अनोळखी वाहनाने धडक दिली आणि चालक अपघाताची माहिती न देता पसार झाला.
Post Views: 23