श्रीपूर – सर्व खाजगी उद्योग क्षेत्रातील साखर कारखाने , विद्युत मंडळ, एस . टी महामंडळ , शेती महामंडळ , यातील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना EPS ९५ ही पेन्शन योजना चालू आहे . या योजने अंतर्गत पेन्शन रुपाने किमान १००० व कमाल ३५०० अशी रक्कम सेवा निवृत्त कामगारांना मिळत आहे . एकीकडे प्रंचड वाढत असलेल्या महागाई मुळे तसेच वृद्धापकाळी उद्भावणारे आजार व त्यांचे औषधांच्या रकमेची सांगड घालणे अतिशय कठीण होऊ बसले आहे .
गेल्या ११ वर्षा पासून कर्नल अशोक राऊत हे दिल्ली येथे किमान ७५०० रु . पेन्शन मिळावी या मागणी साठी आंदोलन करीत . परंतू केंद्र सरकार कडून या मागणीस कसलाच प्रतिसाद मिळत नाही .
या पार्श्वभूमीवर श्रीपूर येथिल सेवा निवृत्त कामगार अरुण कुलकर्णी ( मार्डीकर ) यांनी माढा मतदार संघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांचे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत ज्या कामगारांनी ३५ ते ४० वर्ष कारखान्यात वा उद्योगात कष्ट करून देशाच्या अर्थव्यस्थेला गतीमान केले ते कर्मचारी आज तुटपुंज्या पेन्शनवर आपले वार्धक्य व आजार व्यतीत करीत आहेत त्यांच्या साठी ज्या प्रमाणे हरियाना सरकारने ६५ वर्षा वरील वृद्धांना तीन हजार पेन्शन चालू करून जगण्याची उमेद व सन्मान दिला आहे . त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार सादर करत असलेल्या अर्थसकल्पात आपण राज्यातील वृद्धांची हलाखीची परिस्थिती पाहता किमान ५००० रु पेन्शनची मागणी लावून धरून त्याचे अंमलबजावणी साठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे .
























