पोलीस पाटलांनी पाच वृक्षाची लागवड करून संगोपन करण्याचे आव्हान पोनि.आयलाने यांनी केले
नवीन नांदेड प्रतिनिधी
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्यात यावे. यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागनाथ आयलाने यांनी दिनांक ४ जुलै रोजी आपल्या ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना बोलावून वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगून प्रत्येक पोलीस पाटलांनी पाच वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आव्हान केले व वृक्ष वाटपही केले.
ग्रामीण पोलीस ठाणे नांदेड येथे दिनांक ४ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना एका संदेशाद्वारे बोलून घेऊन त्यांना परिसरातील वृक्षतोडीमुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम याबाबत माहिती देऊन परिसरातील वृक्षतोड न होता आता आपण वृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन केल्यास पर्यावरण संतुलित राहण्यास मदत होईल यासाठी पोलीस निरीक्षक आईलाने यांनी प्रत्येक पोलीस पाटील यांनी पाच वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे असे आव्हानात्मक सांगून प्रत्येकांना पाच वृक्ष देण्यात आले
यावेळी हद्दीतील पोलीस पाटील खंडेराव बकाल राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील यांच्यासह बाळासाहेब सूर्यवंशी, सुमन खोसडे, अरुणा ठोके, नागोराव जाधव, लवकुश अवनुरे, संजय यन्नावार, सुदर्शन कर्डिले, जयश्री इंगळे, सुनिता अवातीरक, महानंदा यलगंधलवार, अल्का बोकारे, सुनिता गाडे, विलास पुयड, श्रद्धा खटके, प्रवीण हंबर्डे, अर्जुन मोगमपल्ले यांच्यासह अन्य पोलीस पाटील व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती