मंगळवेढा – खरीप हंगाम 2023 मध्ये मंगळवेढा पंढरपूर मतदार संघातील 42460शेतकऱ्यांनी 83091 विमा अर्ज भरले होते.त्यापैकी 46446 शेतकऱ्यांना 16कोटी 26लाख नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांचे बँक खातेवर जमा करण्यात आले आहेत. परंतु याच 2023 खरीप हंगामातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान व काढणी पश्चात नुकसान बाबत एकूण 4503 शेतकऱ्यांचे 5कोटी 71लाख रुपये शेतकऱ्यांचे विमा दावे विमा कंपनीकडून नाकारण्यात आले आहेत. परंतु कंपनीला याबाबत सूचित करून शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल करून घेण्यास सांगितले होते. त्यानंतर ही अद्याप पिक विमा निधी मदत शेतकऱ्यांना मिळाला नाही.
कंपनीने सादर केलेले म्हणणे हे अयोग्य असून कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. अपेक्षित पर्जन्यमान झाले नाही असे म्हणणे असताना स्वतः मतदार संघात गावामध्ये फिरताना त्या भागात नुकसान झालेबाबत शेतकऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मदत मिळावी हीच मागणी केली. नैसर्गिक आपत्ती नुकसान आणि काढणी पश्चात नोंदी केलेल्या तक्रारी केलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला पाहिजे.
शेतकऱ्यांनी पाऊस पडलेबाबत विमा कंपनीला सूचीत केले होते परंतु पर्जन्यमापक केंद्र महसूल मंडळ मधील एका गावात बसवलेले आहे त्यानुसार तेथे पाऊस पडला तरच विमा कंपन्या पर्जन्यमान ग्राह्य धरतात म्हणजे मंडळातील इतर गावात पाऊस पडलेला असताना केवळ पर्जन्यमापक बसवलेल्या गावात पाऊस नाही म्हणून महसूल मंडळातील सर्व गावांमध्ये पाऊस पडला नाही असे म्हणता येणार नाही. अशावेळी कंपनी प्रतिनिधी अथवा सर्व्हेयर यांनी प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक होते.
ज्या भागात पर्जन्यमान कमी दाखविले त्या भागात मी प्रत्यक्ष पाहणी केली असून शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे. त्यामुळे विमा कंपनी आणि प्रशासनाने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विमा लाभ मिळवून द्यावा अशी सूचना आ. समाधान आवताडे यांनी केल्या.सोलापूर जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान झालेल्या खरी प 2023 हंगामातील पिकांच्या प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई बाबत तक्रार निवारण करण्याच्या उद्देशाने तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक पार पडली.
सदर बैठकीस कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, अव्वर सचिव श्रीकांत जांभवडेकर, कृषी उपसंचालक शांत धनवडे, ओरिएंट इन्शुरन्स कंपनीचे राज्यव्यवस्थापक विनायक दीक्षित, शेतकरी प्रतिनिधी सरोज काझी, इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते..


















