लोकप्रिय मराठी अभिनेता प्रथमेश परब लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आता त्याने त्याच्या साखरपुड्याची तारीखही सांगितली आहे.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. त्याने ‘टाइमपास’ आणि टाइमपास ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांना वेड लावलं. त्यानंतरही तो अनेक चित्रपटात झळकला. आता प्रेक्षकांचा लाडका दगडू त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत लग्नगाठ बांधणार आहे. गेल्यावर्षी व्हेलेंटाईन डे च्या दिवशी त्याने एक पोस्ट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या केळवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना गोड सरप्राइज दिलं. आता त्याने तो साखरपुडा कधी करणार आहे हे सांगितलं आहे. प्रथमेश आणि त्याची होणारी पत्नी क्षितिजा घोसाळकरयांनी एक पोस्ट करत आपल्या साखरपुड्याची तारीख सांगितली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. ही पोस्ट करत त्यांनी लिहिलं, ‘१४. २. २०२४, व्हॅलेंटाईन डेचं आमच्या रिलेशनशिपमध्ये खास स्थान आहे. म्हणजे आम्ही व्हॅलेंटाईन डे वगैरे या कंसेप्टवर कधी फार विश्वास नाही ठेवायचो. नेहमीच्या दिवसा सारखाचं तोही एक दिवस, त्यात इतकं काय खास? पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टीच खूप खास बनतात. १४ फेब्रुवारी २०२०- माझी व्हॅलेंटाईन डे स्पेशल फोटोशूट सीरिज बघून प्रथमेशने मला पहिल्यांदा मेसेज केला. १४ फेब्रुवारी २०२१- आमच्या नात्याला सुरुवात झाली. १४ फेब्रुवारी २०२२- खूप आठवणींसह एक वर्ष पूर्ण झालं. १४ फेब्रुवारी २०२३- आमच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर ऑफिशिअल अनाउन्स केलं.’
नी पुढे लिहिलं, ‘१४ फेब्रुवारी २०२४ ला आमच्या नात्याला ३ वर्षे पूर्ण होत आहेत मग आता काहीतरी खास केलंच पाहिजे ना!! म्हणून १४ फेब्रुवारी २०२४ ला आम्ही साखरपुडा करायचं ठरवलंय. आम्ही आमच्या आयुष्यातील नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज आहोत. लग्नाची तारीख अजूनही गुलदस्त्यातच आहे बरं का.’ त्यांच्यावर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. चाहते त्यांच्या साखरपुड्यासाठी उत्सुक आहेत.