धाराशिव – तालुक्यातील आळणी येथील डॉ. दिव्या अरुण वीर यांनी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस पदवी संपादन केली. ग्रामीण पार्श्वभूमीतून येत त्यांनी जिद्द व परिश्रमाच्या जोरावर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांच्या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. डॉ. दिव्या वीर ही दिव्यंगत माजी सरपंच अरूण (पापा) वीर यांची सुकन्या असून आळणी गावचे विद्यमान सरपंच प्रमोद वीर यांची ती पुतणी आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























