सोलापूर : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवीऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवीऐवजी इयत्ता सातवीमध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे. या बदलामुळे चौथीसाठी पाच हजार, तर सातवीच्या मुलांना सात हजारांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
दरम्यान, केंद्र शासनाच्या मोफत सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यामधील तरतुदी लक्षात घेऊन २९ जून २०१५ च्या शासन निर्णयान्वये कार्यान्वित असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता चौथीऐवजी पाचवी व इयत्ता सातवीऐवजी इयत्ता आठवी असा करण्यात आला होता.
इयत्ता चौथी व पाचवीकरीता प्रत्येकी १६ हजार ६९३ आणि इयत्ता सातवी आणि इयत्ता आठवी करिता प्रत्येकी १६ हजार ५८८ शिष्यवृत्ती संच मंजूर राहतील. त्याचप्रमाणे यापुढे पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा’ (इयत्ता चौथी स्तर शिष्यवृत्ती परीक्षेचे नाव ‘प्राथमिक आणि ‘उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी स्तर) असे करण्यात येणार आहे.
…,,,
नव्या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवीसाठी होत आहे. त्याचे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने स्वागत आहे . ग्रामीण भागातील, वाडीवस्तीवरील इयता चौथीपर्यंतचे वर्ग असणाऱ्या हजारो शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शाळांची पटसंख्या व गुणवत्तावाढीसाठी निश्चितच मदत होणार आहे .
नीलेश देशमुख, सरचिटणीस, शिक्षक सहकार संघटना,
….
सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा साधारणपणे २२ हजार विद्यार्थी देतात. त्यातील साधारणपणे ६४५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरतात. तसेच आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा साधारणपणे १५ हजार विद्यार्थी देतात. आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांपैकी ६३८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरतात
…
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी
..,
ग्रामिण भागात चौथी व सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळा असतात. त्यामुळे
शिष्यवृत्ती परीक्षा चौथी आणि सातवीपर्यंत झाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण मधील विद्यार्थ्यांचे टॅलेंट सिध्द होणार आहे.
श्रीकांत भरले, संस्थापक , ट्राॅय पब्लिक इंग्लिश मिडीयम स्कूल,
….
शासनाच्या निर्णयाचे स्वागत
…
शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेत बदल करून स्तररचना बदलली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत शिकणार्या गरीब व हुशार मुलांना चौथी व सातवीचे शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास मदत होणार आहे. शिवाय जिल्हा परिषद शाळेतून त्याची तयारीही करून घेण्यास मदत होणार आहे.
प्रकाश कुंभार, मुख्याध्यापक, मंद्रूप मुलांची केंद्रशाळा.




















