Wednesday, April 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतकरी केंद्रबिंदू मानून सुविधासह समाधानकारक व्यापार तडीस न्यावा

तरुण भारतbyतरुण भारत
October 29, 2025
in solapur
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – राज्यात कांद्याच्या विक्रमी उलाढालीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन संचालक मंडळांना कामकाज करावे. शेतकऱ्यांसाठी पूर्णब्रह्म योजनेच्या माध्यमातून अत्यल्प दरात जेवणाची सुविधा तसेच आता नव्या निर्णयानुसार विद्यार्थी वस्तीगृहात शेतकरी भवन उभारण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या असून, शेतकरी केंद्रबिंदू मानून सर्व मूलभूत सोई सुविधासह समाधानकारक व्यापार करत बाजार समितीने त्या सर्व मागण्या तडीस न्याव्यात, अशी एकच निर्मळ अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. दिवाळीनिमित्त गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला बाजार समितीमधील व्यापार आता सुरळीत सुरू झाल्यानंतर बाजार समितीमध्ये आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील चढउतार पाहता भावनांना मोकळी वाट करून दिली.

        राज्यात विक्रमी उलाढाल आणि उत्पन्नासाठी अल्पावधीतच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रसिद्ध झाली आहे. राज्यातील नाशिक लासलगाव कांद्याच्या बाजारपेठात सोलापूर बाजार समितीचे मोठे नाव आहे. सोलापुरातील बाजारात मिळणारा भाव हा सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांना परवडणारा असतो. त्यामुळेच शेतकरी विश्वास ठेवून सातत्याने सोलापूर बाजार समितीमध्ये आपला शेतमाल विक्रीसाठी आणतो. येथील अडते, खरेदीदार आणि व्यापारी, यांच्या माध्यमातून कांद्याची बाजारपेठ दक्षिण भारतासह पश्चिम बंगाल आणि उत्तर भारतात पसरली आहे. सोलापुरातील कांदा सर्वत्र विकला जात आहे. त्यामुळेच कांद्याची मागणी वाढून भाव देखील चांगल्या दरात मिळत आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला शेतमाल पूर्णतः नष्ट झाला. त्यामुळे बाजार समितीत विक्रीसाठी आणला जाणारा कांदा, भाजीपाला, फळभाजी तसेच फळे या शेतमालाच्या दरात चढ- उतार निर्माण झालेली दिसत आहे.

          दरम्यान, सोलापूर बाजार समिती कांद्याच्या उलाढालीसाठी प्रसिद्ध असताना कांद्याचे दर सध्या  स्थिरच आहेत. कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात उठाव नसल्याने शेतकरी देखील वाढीव दराच्या अपेक्षित आहे. मध्यंतरी पावसामुळे कांदा वावरातच भिजला, त्यामुळे नसलेला कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्याने दर जैसे थेच आहेत. दिवाळी सुट्ट्यानंतर शनिवारी सोलापूर बाजार समितीमध्ये पूर्वव्रत कामकाज सुरू झाले. त्यावेळी बाजारात २५० ट्रक कांद्याची आवक आली होती. बाजारपेठा बंद असल्यामुळे त्या कांद्याला प्रत्येक क्विंटल किमान १५० रुपये ते कमाल २२०० रुपये तर सर्वसाधारण १८०० रुपये असा दर मिळाला. मात्र त्यानंतर कांद्याच्या आवक आणि दरामध्ये घसरण सुरूच आहे. मंगळवारी बाजार समितीमध्ये १५० ट्रक कांद्याची आवक येऊन देखील दर १५०० इतकाच राहिला आहे. आवक कमी होऊन देखील दरात घसरण कायम आहे. आता कांद्याची नवी खेप बाजारपेठेत विक्रीसाठी येणार असल्याने दर वाढेल, अशी शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

बाजार समितीने व्यवहारात चोखंदळ असावे.

बाजार समिती प्रशासनाच्या वतीने संबंधित अडते खरेदीदार व्यापारी यांच्याकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पट्टीमध्ये नेहमीच गोंधळ निर्माण होतो. अनेक व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात. अशा व्यापाऱ्यांविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी. वारंवार पट्ट्या बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. त्यांचा परवाना रद्द करावा. अशा घटना बाजार समितीमध्ये घडताना दिसतात. त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम होतो. 

– बळी कादे, कांदा उत्पादक शेतकरी कासेगाव

शेतकरी भवन आवश्यक.

परजिल्ह्यातून आपला शेतमाल सोलापूर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना विश्रांती मिळावी यासाठी शेतकरी भवन गरजेचे आहे. बाजार समितीमध्ये अंतर्गत रस्ते लाईट आहेत.परंतु पाणी आणि शेतकरी भवन यांची कमतरता आहे. मुबलक पाणी मिळावे. शेतकऱ्यांना विसावा घेण्यासाठी शेतकरी भवन लवकरात लवकर तयार करावे.

– नेताजी पाटील, शेतकरी दक्षिण सोलापूर 

आर. ओ. प्लांट सुरू ठेवावे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी फिल्टर पाण्याचे आर.ओ.प्लांट तयार केले. परंतु हे प्लांट चालू आहेत का नाही? हे माहित नाही. स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे हीच अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे बाजार समिती आवारात स्वच्छता असावी.

– भैरू पाटील, शेतकरी उळेगाव 

शेतकऱ्यांची फसवणूक आणि शेतमाल चोरी जाऊ नये यासाठी प्रयत्न करावे. 

सोलापूर बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणणारा शेतकरी हाच महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांवरच बाजार समिती अवलंबून असून, शेतकऱ्यांच्या सुविधासाठी बाजार समिती प्रशासनाने प्रयत्न करावेत. वाढीव दर तसेच भौतिक सुविधा पुरवाव्यात. शेतकऱ्यांची फसवणूक आणि शेतमाल चोरी होऊ नये यासाठी उपाययोजनात्मक कार्यवाही करावी.

– कल्लप्पा फुलारी, शेतकरी आचेगाव 

Post Views: 19
Previous Post

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तर होणार नव्याने सुरू

Next Post

महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर तक्रार दाखल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर तक्रार दाखल

ताज्या बातम्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

April 21, 2026

भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त पारंपारीक वाद्यासह मिरवणूक

April 21, 2026

मॉरिशस शांती परिषदेसाठी डॉ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

April 21, 2026

राजेश पवार यांची राष्ट्रीय बंजारा परिषद प्रदेश प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

April 21, 2026

प्रा. चरणसिंह कायटे यांचे दुहेरी यश

April 21, 2026

सोलापूर शहरात पावसाची हजेरी

April 21, 2026

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822898

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697