पंढरपूर – पंढरपूरची मुद्रण परंपरा खूप जुनी, अगदी देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीची आहे. मुद्रण क्षेत्रात नवनवीन बदल झाले तरी नव्या-जुन्याचा संगम साधत होतकरु तरुणांनी ही परंपरा सांभाळून ठेवल्याचे प्रतिपादन येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश घळसासी यांनी केले.
‘जागतिक मुद्रण दिनानिमित्त पंढरपूर युवा मुद्रक संघटनेच्या वतीने नव्या पिढीच्या कष्टाळू, प्रामाणिक मुद्रण-व्यावसायिकांच्या ‘ गौरवपूर्ण ‘ सन्मानचिह्न देवून यथोचित सन्मान घळसासी यांच्या हस्ते केला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी, पंढरीच्या डीटीपी क्षेत्राचे यशस्वीकर्ते अतुल बहिरट होते.
याप्रसंगी युवा मुद्रक संघाचे जनक अध्यक्ष दत्ताजीराव पाटील, सचिव रामकृष्ण बिडकर, बबनराव सुरवसे, श्रीराम रसाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे आधारस्तंभ मंदार केसकर यांनी केले.
——————-
कष्टकरी मुद्रकांचा सन्मान केल्याचे समाधान
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत, येथील मुद्रण क्षेत्रातील सचोटी- प्रामाणिकपणा, गुणवत्ता वाढीस लावणाऱ्या कष्टकरी मुद्रकांचा सन्मान केल्याचे समाधान मिळाल्याची भावना यावेळी अतुल बहिरट आणि रमेश घळसासी यांनी व्यक्त केली.
——————-
सन्मानप्राप्त युवा मुद्रक
मुद्रण दिना निमित्त येथील सुरज कोठारी, अमोल चव्हाण, श्रीनाथ साळुंखे, मंदार केसकर, रामकृष्ण बिडकर, शिवम पाटील ,सुरज सुरवसे, स्वप्नील यादव, शुभम परदेशी, श्रीराम रसाळ, संतोष गोंजारी, विधेंद्र मोरे,गणेश वायचळ, शितल कोठारी, आकाश साळुंखे आदींचा सन्मान करण्यात आला.

























